Mul Dialysis Centre Chandrapur मूल उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी डॉ. बंडू रामटेके व मान्यवर

मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 26, 2026

मूल – Mul Dialysis Centre Chandrapur चे लोकार्पण महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे मूल व लगतच्या परिसरातील किडनी विकाराच्या रुग्णांना स्थानिक स्तरावर डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. लोकार्पणानंतर सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर पहिले डायलिसिस करण्यात आले. जिल्ह्यातील हे तिसरे डायलिसिस केंद्र असून चंद्रपूरमधील रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल. (चंद्रपुरात स्वस्तिक पॅटर्न चा शुभारंभ, वाचा हि महत्वाची बातमी)

मूल उपजिल्हा रुग्णालयात Mul Dialysis Centre Chandrapur चे लोकार्पण

उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रवीण पंत, पोटदुखे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभिषेक दीक्षित, प्रा. महेश पानसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकार्पणानंतर केंद्रामध्ये प्रत्यक्ष डायलिसिस सेवेला सुरुवात करण्यात आली. सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या केंद्रातील पहिले डायलिसिस करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे यापूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे मूल व परिसरातील रुग्णांना त्यांच्या जवळच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डायलिसिस केंद्रावरील रुग्णांचा ताण कमी होण्यासही मदत होईल.

किडनी विकाराच्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये आणि आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी  कार्यान्वित झाले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रामटेके यांनी केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment