Ghughus Rural Hospital Inauguration by Guardian Minister Ashok Uike and MLA Kishor Jorgewar

५० हजार जनतेचे स्वप्न पूर्ण; घुग्घूस ग्रामीण रुग्णालय सुरू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 19, 2026

चंद्रपूर – Ghughus Rural Hospital Inauguration सोहळा सेवा संकल्प अभियानांतर्गत उत्साहात पार पडला आहे. पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार करण देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रुग्णालयामुळे आता घुग्घूससह परिसरातील ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तातडीच्या उपचारासाठी वारंवार चंद्रपूरला जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. (हे हि वाचा – बल्लारपूर होणार शिक्षणाचे हब)

घुग्घूसच्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यामुळे आता येथील नागरिकांना उपचारासाठी वारंवार चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या घुग्घूसचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून नगर परिषद, उड्डाणपूल आणि आता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

Ghughus Rural Hospital Inauguration मुळे चंद्रपूरचा फेरा वाचणार

 सेवा संकल्प अभियाना अंतर्गत घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याने घुग्घूस आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उपचारासाठी चंद्रपूर शहराचा प्रवास करण्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सेवा संकल्प अभियानातून आरोग्य सुविधा घराघरापर्यंत

             यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, घुग्घूस येथे ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेता येथे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक होते. आता ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यामुळे घुग्घूससह परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः तातडीच्या उपचारांसाठी नागरिकांना चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता कमी होणार असून स्थानिक पातळीवरच आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

              घुग्घूसच्या सर्वांगीण विकासाचा उल्लेख करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, अनेक वर्षांपासून घुग्घूसचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालत होता. मात्र ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असतानाही शहराला नगर परिषदेचा दर्जा नव्हता. घुग्घूसच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन येथे नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळून घुग्घूस नगर परिषदेची स्थापना झाली. त्यामुळे शहरातील नागरी सुविधा आणि विकासकामांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले आहे.

नगर परिषद ते उड्डाणपूल: घुग्घूसच्या विकासाची घोडदौड

            घुग्घूसमधील उड्डाणपूल आणि आता ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या विकासाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे टप्पे आहेत. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देत घुग्घूसला अधिक विकसित शहर म्हणून पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील. विकासाची ही गती कायम ठेवत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment