Jivati Rodguda Theft Case जिवती रोडगुडा येथे घरफोडीत चोरीला गेलेली रोकड व चांदीचा कडा दर्शवणारे प्रतिकात्मक छायाचित्र

जिवती तालुक्यातील शेतकरी कुटुंबाला चोरीचा धक्का

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 27, 2026

जिवती: Jivati Rodguda Theft Case मध्ये जिवती तालुक्यातील रोडगुडा येथे घरधनी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात तर पत्नी शेतात कामासाठी गेली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. प्रेमसिंग सखाराम ब्यास व त्यांच्या पत्नी सभोताबाई यांच्या घरातील लोखंडी पेटी तोडून त्यातील २५ हजार रुपये रोकड व १० तोळ्यांचा चांदीचा कडा असा एकूण २५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. जिवती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (चंद्रपुरात माजी नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल)

रोडगुडात घर बंद असल्याची संधी साधून घडली Jivati Rodguda Theft Case

मिळालेल्या माहितीनुसार, रोडगुडा येथील रहिवासी प्रेमसिंग सखाराम ब्यास (वय ६० वर्षे) हे आपल्या पत्नीसह राहून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रेमसिंग ब्यास हे शेतातून भाजीपाला तोडून जिवती येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी निघून गेले. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी सभोताबाई ब्यास या देखील घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेल्या होत्या.

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पत्नी सभोताबाई शेतातून घरी परत आल्या असता, त्यांना मुख्य दाराचे कुलूप कोंड्यापासून तुटून खाली पडलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील सर्व कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते आणि लोखंडी पेटीचे कुलूपही तोडलेले आढळले. पेटीत तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेला १० तोळे वजनाचा चांदीचा कडा (अंदाजे किंमत ₹५५०) आणि भाजीपाला विक्रीतून जमवलेले नगदी २५ हजार रुपये (५०० रुपयांच्या ७ नोटा, २०० रुपयांच्या २७ नोटा आणि १०० रुपयांच्या १६१ नोटा) असा एकूण २५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले.

पत्नीने घटनेची माहिती आठवडी बाजारात असलेल्या पतीला दिल्यानंतर दोघांनी घरी येऊन खात्री केली आणि २५ सप्टेंबर रोजी जिवती पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीवरून जिवती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्र. ०१७०/२०२०) दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल राहाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment