Adarsh Rajya Shikshak Puraskar presented to Dr Sanjay Gore in Pune

गडचांदूरच्या प्रा. डॉ. संजय गोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

चंद्रपूर – Adarsh Rajya Shikshak Puraskar हा महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार प्रा. डॉ. संजय गोरे यांना प्रदान करण्यात आला.

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ५ सप्टेंबर रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा गौरव झाला. डॉ. गोरे हे गडचांदूर येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाने चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. (हे हि वाचा – ८ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात मिसेस मुख्यमंत्री येणार)

गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन व सिनेट सदस्य तथा गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक व व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांना महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार 2025-26 हा पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सपत्निक प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मान चिन्ह , शासनाचे सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


डॉ.संजय गोरे हे 2012 पासून विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणावर कार्यरत असून त्यांची 10 पुस्तके व त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांना पी. एचडी.पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांचे विविध संशोधन पत्रिकेत 77 लेख प्रकाशित झाले असून त्यांचा 100 च्या वर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग आहे. त्यांना या आधी गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तथा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केले असून गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडी वर कार्यरत आहे. सिनेट सदस्य म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सक्रिय , भरीवपणे ते कार्य करीत आहे.डॉ संजय गोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment