Chandrapur Teacher Award Ceremony organized at Priyadarshini Sabhagruh

तीन जिल्ह्यांतील शिक्षकांचा चंद्रपुरात सन्मान सोहळा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

चंद्रपूर : Chandrapur Teacher Award Ceremony चे आयोजन शिक्षक दिनानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.

हा भव्य सोहळा रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडेल. आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार अभिजीत वंजारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. (हे हि वाचा – गडचांदूर चे शिक्षक संजय गोरे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान)

या कार्यक्रमात चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण वर्तुळात या सोहळ्याची मोठी उत्सुकता आहे.

Chandrapur Teacher Award Ceremony: शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वाचा होणार गौरव

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाऊंडेशन, नागपूर व गोविंद मैना फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह. चंद्रपूर येथे सन्मान कर्तृत्वाचा ‘उत्कृष्ठ शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, उद्घाटक म्हणून आमदार ॲड. अभिजीत वंजारी, प्रमुख अतिथी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांची मंचावर उपस्थिती राहणार आहे.

या सन्मान सोहळ्यात चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य व संस्था चालकांचा सन्मान येणार आहे. तसेच माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे व डॉ. बबनराव तायवाडे यांना ‘जीवनगौरव सन्मान २०२६’ने गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यास शिक्षकवृंद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाऊंडेशन, नागपूर व गोविंद मैना फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment