चंद्रपूर – chandrapur manpa school news संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी तेलगू हायस्कूलला भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील शैक्षणिक वातावरणाचा आणि भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याची टाकी खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत होती. सभापतींनी त्वरित प्रशासनाला नवीन टाकी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. अवघ्या काही तासांत शाळेत नवीन पाण्याची टाकी बसवण्यात आली. (हे हि वाचा – शहिदांना श्रद्धांजली)
भेट देण्यादरम्यान, शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी अचानक खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याची बाब शिक्षकांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. विषयाचे गांभीर्य ओळखून सौ. मनस्वी गिऱ्हे यांनी तात्काळ प्रशासनास निर्देश दिले. सभापतींच्या या सूचनेनुसार आजच शाळेत नवीन पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावला आहे.
या संवेदनशील कार्यपद्धतीमुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






