Irai River Dredging Case अंतर्गत खोलीकरण कामाची प्रशासनाकडून पाहणी

चंद्रपूर इरई नदी खोलीकरण प्रकरणात गैरप्रकाराचा आरोप, महापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 9, 2026

चंद्रपूर : Irai River Dredging Case अंतर्गत चंद्रपूर शहरातील इरई नदी खोलीकरण टप्पा-२ कामातील कथित गैरप्रकारांवर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. महापौर संगिता खांडेकर, स्थायी समिती सभापती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून कामातील त्रुटी तपासल्या. या प्रकरणामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. (जिल्हाधिकारी पंत यांचा ग्रामीण भागात रात्र दौरा)

इरई नदी खोलीकरण टप्पा-२ कामातील कथित गैरप्रकार प्रकरणी आज महापौर, स्थायी समिती सभापती तसेच खोलीकरण उपसमितीच्या सदस्यांनी खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य पप्पू देशमुख यांनी नदीपात्रातील वस्तुस्थिती दाखवत कामातील अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

Irai River Dredging Case मध्ये प्रशासनाची कारवाई

आज झालेल्या पाहणीत महापौर संगिता खांडेकर, स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे, खोलीकरण उपसमितीच्या सदस्या श्रुती घटे, शहर अभियंता रवि हजारे, सहाय्यक अभियंता आशिष भारती उपस्थित होते. काल दिलेल्या लेखी तक्रारीनंतर आज ही संयुक्त पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान देशमुख यांनी खोलीकरणातून काढलेल्या मातीचे गायब झालेले ढिगारे, नदीपात्रातच टाकण्यात आलेली माती तसेच कामाच्या प्रत्यक्ष स्थितीतील तफावत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. काही ठिकाणी अपेक्षित प्रमाणात खोलीकरणच झाले नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले.


महापौर व स्थायी समिती सभापती यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना खोलीकरणाच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. कामातील अनियमिततेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले.

काल नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौर, स्थायी समिती सभापती व मनपा आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत खोलीकरणातील मातीची अवैध विक्री, ऑनलाईन क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारणे तसेच कामाच्या आकडेवारीतील मोठी तफावत यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. या तक्रारीनंतर प्रशासनात खळबळ उडाली असून आजची प्रत्यक्ष पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
इरई नदी खोलीकरणाच्या नावाखाली झालेल्या गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनविकास सेनेतर्फे पुन्हा करण्यात आली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment