Chandrapur Nagarsevak Boycott News - मनपा महासभेत गोंधळ व निदर्शने

चंद्रपूर मनपात राडा! महापौरांसमोर सचिवांचा माईक तोडला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 5, 2026

चंद्रपूर: Chandrapur Nagarsevak Boycott News चंद्रपूर महानगरपालिकेत ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत राजकीय गोंधळ उडाला. महापौरांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत सर्वपक्षीय ४५ नगरसेवकांनी महासभेवर बहिष्कार टाकला.

स्वीकृत सदस्यांची नियुक्ती आणि नियमबाह्य कामकाजावरून विरोधकांनी सभागृहात माईक तोडून जोरदार निदर्शने केली. तीव्र विरोधामुळे शेवटी महापौर संगीता खांडेकर यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. (हे हि वाचा – महिला सुरक्षेत निष्काळजीपणा, चंद्रपुरातील ६७ संस्थांना नोटीस)

या राजकीय नाट्यामुळे चंद्रपूर मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वीकृत सदस्यांची नियुक्ती, सातत्याने नियम डावलून होणाऱ्या आमसभा व आमसभेतील नियमबाह्य कामकाज यामुळे शहराच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे, गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदारांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप करून अनेक नगरसेवकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने महानगरपालिकेचे वातावरण चांगलेच तापले.आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.


या सभेच्या विषय पत्रिकेवर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी महापौर संगीता खांडेकर यांना दिला होता. यापूर्वीच्या रद्द केलेल्या आमसभेतील स्वीकृत सदस्यांचा विषय घेण्याचे महापौर यांनी यावेळी टाळले. महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेना, शिवसेना उबाठा गट तसेच विरोधी पक्षातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महानगर आघाडी या चारही गटाचे गटनेते तसेच उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह 45 नगरसेवकांनी आज आम सभेचा बहिष्कार केला. प्रशासनाने नियमानुसार प्रस्ताव दिल्यानंतरही नियम डावलून महापौरांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. यावरून संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी बहिष्कराचे शस्त्र उगारले.


महापौर संगीता खांडेकर वारंवार नियम डावलून आमसभा आयोजित करीत असल्याचा तसेच आमसभेचे कामकाज सुद्धा मनमानी पद्धतीने करीत असल्याचा या नगरसेवकांचा आरोप आहे.
या सर्व मनमानीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस व महानगर आघाडीच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत निदर्शने देऊन जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे विरोध सुरू असताना सभागृहात आम सभेकरिता 22 नगरसेवकांचे संख्याबळ जमविण्याचा प्रयत्न महापौर खांडेकर यांच्याकडून सुरू होता. तर दुसरीकडे महापौरांच्या कार्यालयासमोर हातात बॅनर घेऊन काँग्रेस व महानगर आघाडीचे नगरसेवक निदर्शने व नारेबाजी करीत होते.

भाजपचे आमसभेत केवळ 7 नगरसेवक

आमसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी 22 नगरसेवक सभागृहात उपस्थित असणे गरजेचे असते.महापौर संगीता खांडेकर यांच्यासह सभागृहात भाजपचे केवळ 7 नगरसेवक उपस्थित होते. राजेश अडुर व वसंता देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सभागृहात हजेरी लावल्याने महापौर यांना 22 चे संख्या गाठणे शक्य झाले. त्यामुळे महापौर यांनी आमसभेचे कामकाज सुरू केले.

यानंतर काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले व महानगर आघाडीचे घटनेचे पप्पू देशमुख आपल्या नगरसेवकांसह सभागृहात हजर झाले. देशमुख यांनी सचिव संतोष गर्गेलवार यांच्याकडून महानगरपालिका अधिनियमाचे पुस्तक हिसकावून घेतले. आयुक्तांच्या पुढे पुस्तक ठेवून त्यांना नियम वाचायला सांगितले, सचिवांचा माईक तोडला. भाजपाचे गटनेते शेखर शेट्टी, नगरसेवक सुभाष कासमगोट्टूवार,संजय कंचर्लावार इत्यादी नगरसेवक तसेच उबाठाचे उपमहापौर प्रशांत दानव व स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिऱ्हे यांनी आक्रमक भूमिका घेऊन सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी दबाव आणला. अखेरीस अभूतपूर्व गोधळामध्ये महापौर यांनी अनिश्चित काळासाठी सभा तहकूब करीत असल्याची घोषणा केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment