Chandrapur CMC Nominated Members meeting with Mayor Sangita Khandekar

चंद्रपूर मनपातील चारही गटनेते एकत्र, केली हि महत्वाची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 5, 2026

चंद्रपूर – Chandrapur CMC Nominated Members विषयावरून चंद्रपूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महानगर आघाडीच्या गटनेत्यांनी महापौर संगीता खांडेकर यांची भेट घेतली. आगामी ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्यांचा विषय समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. पूर्वीच्या सभेत हा विषय न घेतल्याने चारही गटनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (हे हि वाचा – मुख्यमंत्री सहायता निधीने दिले नवजीवन)

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यानंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत सदस्यांचा विषय घेणे नियमानुसार आवश्यक असते. मात्र यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे महापौरांनी सर्वसाधारण सभा रद्द केली होती.

५ ऑगस्टच्या सभेवरून चारही गटनेते एकवटले

आता न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दि. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरही स्वीकृत सदस्यांचा विषय समाविष्ट करण्यात आलेला नसल्यामुळे चारही गटनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्वीकृत सदस्यांचा विषय घेण्यासाठी व नियमबाह्य सर्वसाधारण सभा पुढे ढकलून नियमानुसार सभा घेण्याच्या मागणीसाठी यापूर्वीही भाजप-शिंदे सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-बसपा, शिवसेना (उबाठा)- वंचित बहुजन आघाडी, तसेच महानगर आघाडीच्या गटनेत्यांनी महापौर संगिता खांडेकर व आयुक्त अकनुरी नरेश यांना वारंवार निवेदने दिली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दि. 5 ऑगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडावी, शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर निर्णय व्हावेत आणि महानगरपालिकेचे कामकाज नियमानुसार व्हावे, या उद्देशाने चारही गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. मात्र महापौरांनी याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचे गटनेत्यांनी सांगितले.

महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन नियमानुसार स्वीकृत सदस्यांचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करावा, यासाठी चारही गटनेत्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment