तळोधी – Chandrapur Man Animal Conflict अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील जनकापूर गावात मंगळवारी दुपारी एका ६१ वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार)
रमेश जयराम काशीवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात धानाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र घबराट पसरली आहे.
रमेश जयराम काशीवार (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काशीवार हे जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात धान (भात) पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संध्याकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी ते शेतात मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली.
नागभीड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेने जनकापूर आणि परिसरातील गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी आणि मानवी व वन्यजीवातील संघर्ष रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जंगलालगतच्या शेतात काम करताना शेतकऱ्यांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षात गेलेला हा २७ वा बळी ठरला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






