चंद्रपूर: ओमॅट कंपनी कामगार मृत्यू प्रकरणाने सिद्धपल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंपनीतील कामगार प्रवीण कुडे (रा. ताडाळी) यांचा काल कंपनीत मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती कंपनीकडून त्यांना देण्यात आली नाही. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. (चंद्रपुरात युवासेनेला बळ, वाचा बातमी)
ओमॅट कंपनी कामगार मृत्यू : काय घडले?
या बेजबाबदार प्रकाराची माहिती मिळताच, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार चंद्रपूर ग्रामीण तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अनिल नरुले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः प्रशासनाशी व संबंधित कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत कंपनीला धारेवर धरले. त्यांच्या या कणखर आणि संवेदनशील भूमिकेमुळे कंपनी व्यवस्थापनाला अखेर नमते घ्यावे लागले.
या यशस्वी पाठपुराव्यामुळे मृताच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, कुटुंबियांना १० लक्ष रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. तसेच, अंत्यविधीसाठी तात्काळ आर्थिक मदत देऊन प्रवीण कुडे यांचा मृतदेह त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






