ताडाळी कामगार संघटना मदत म्हणून कुटुंबीयांना धनादेश देताना पदाधिकारी

दिवंगत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत, ताडाळी कामगार संघटनेचा पुढाकार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 5, 2026

चंद्रपूर : ताडाळी कामगार संघटना मदत उपक्रमात दिवंगत कामगाराच्या कुटुंबाला ८४ हजार ३०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. ताडाळी एमआयडीसी येथील स्पंज आयर्न कामगार संघटनेने हा उपक्रम राबवला. गोपाणी येथील कामगार भानुदास मारोती उकिणकार (रा. सोनेगाव) यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी ही मदत करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. (८२ मुलांना केलं अर्धंटक्कल, वाचा हि बातमी)

ताडाळी कामगार संघटना मदत: उकिणकार कुटुंबाला धनादेश

संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. कामगार हा केवळ औद्योगिक व्यवस्थेचा एक घटक नसून तो आपल्या कुटुंबाचा आधार असतो. अशा वेळी एखाद्या कामगाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. ही जाणीव ठेवून संघटनेच्या वतीने दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.

कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्याबरोबरच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, ही भूमिका ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटना सातत्याने जपण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमातून संघटनेतील एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे, उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक्ष श्री. दशरथ रोगे, तसेच श्री. विजय मोरे, श्री. नंदू टोंगे, श्री. सागर कन्नीरवार, श्री. विकास आवारी, श्री. संतोष खोब्रागडे आणि श्री. महेश जुनघरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

कामगारांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या या उपक्रमामुळे ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment