चंद्रपूर : Chandrapur Toll Scam News मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी मार्गावरील टोल प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. करारातील नियमांचे उल्लंघन करून ओव्हरलोडच्या नावाखाली अतिरिक्त टोल वसूल करण्यात आला. शिवसेनेचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश मनोज जिवतोडे यांनी हा आरोप केला आहे. दररोज २ ते ३ लाख रुपयांची अवैध वसुली होत होती. मागील ११ वर्षांत हा घोटाळा १५० कोटींच्या घरात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर MIDC मधील ६७ पडीक भूखंड रद्द)
वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी टोल प्रकल्पावर २६ डिसेंबर २०१४ पासून टोल वसुली सुरू करण्यात आली. संबंधित ओव्हरलोड वाहनांवरील अतिरिक्त टोल संदर्भातील तरतुदीनुसार निर्धारित मर्यादेपेक्षा कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांवर त्याच पद्धतीने अतिरिक्त टोल आकारता येत नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.मात्र, उपलब्ध टोल पावत्यांच्या परीक्षणातून १० टक्क्यांपेक्षा कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांकडूनही अतिरिक्त रक्कम आकारण्यात आल्याचे, तसेच काही वाहनांचे ओव्हरवेट शून्य असतानाही अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा मुकेश जिवतोडे यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती वाहनांकडून आणि किती रक्कम नियमबाह्य पद्धतीने वसूल करण्यात आली, याची संपूर्ण वाहननिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिवतोडे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित टोल नाक्यावर ओव्हरलोडच्या नावाखाली दररोज सरासरी दोन लाख रुपयांच्या आसपास अतिरिक्त टोल वसूल केला जात होता. २०१४ पासून २०२५ पर्यंत ११ वर्षे अशा पद्धतीने वसुली झाल्याचा आरोप असून, संपूर्ण कालावधीतील वाहननिहाय व्यवहारांची तपासणी केल्यास कथित गैरवसुलीची रक्कम सुमारे १५० कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ही रक्कम अंतिम किंवा अधिकृत निष्कर्ष नसून,अवैध ओव्हरलोड टोलवसुलीचा गंभीर आरोप केल्याचा वा १५० कोटींच्या गैरव्यवहाराची उच्च चौकशीची मागणी करीत मुकेश जिवतोडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार केल्या.
ओव्हरलोडच्या नावाखाली दररोज २ ते ३ लाख रुपयांची अतिरिक्त लूट
वरोरा चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी मार्गावरील टोल प्रकल्पात करारातील तरतुदींचे उल्लंघन करून वाहनधारकांकडून ओव्हरलोडच्या नावाखाली अवैधरित्या अतिरिक्त टोल वसूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश मनोज जिवतोडे यांनी केला आहे. या अवैध वसुलीची व्याप्ती अनेक वर्षांची असून, दररोज सरासरी २ ते ३ लाख रुपयांच्या आसपास ओव्हरलोड टोल वसूल करण्यात आल्यास हा संपूर्ण प्रकार सुमारे १५० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निर्धारित मर्यादेपेक्षा कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांवर त्याच पद्धतीने अतिरिक्त टोल आकारता येत नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे० मात्र, उपलब्ध टोल पावत्यांच्या परीक्षणातून १० टक्क्यांपेक्षा कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांकडूनही आकारण्यात आल्याचे, तसेच काही वाहनांचे ओव्हरवेट शून्य असतानाही अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा मुकेश जिवतोडे यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती वाहनांकडून आणि किती रक्कम नियमबाह्य पद्धतीने वसूल करण्यात आली, याची संपूर्ण वाहननिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘करारातील तरतुदींविरुद्ध वाहनधारकांकडून जादा ओव्हरलोड टोल वसूल झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तक्रार केल्यानंतर वसुली थांबली असल्याचा दावा असताना, मागील अनेक वर्षांच्या वसुलीचा हिशोब आणि त्याची चौकशी का झाली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. संबंधित डेटा बदलला किंवा नष्ट केला असल्यास त्यामागील व्यक्तींची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांवर गुन्हे दाखल होत असतील तर त्याचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आर्थिक व डिजिटल फॉरेन्सिक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे,’ अशी मागणी मुकेश मनोज जिवतोडे यांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






