बल्लारपूर तलवार आरोपी अटक प्रकरणात कारवाई करणारे बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक

हातात तलवार घेऊन दहशत पसरवणारा १८ वर्षीय आरोपी अटकेत, बल्लारपूर पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 13, 2026

बल्लारपूर (चंद्रपूर): बल्लारपूर तलवार आरोपी अटक प्रकरणात पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडी तलवार घेऊन फिरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही कारवाई मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पहाटे बुद्धनगर प्रभागात झाली. नवरात्री उत्सवानिमित्त बल्लारपूर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुमारे ७९ सेंटीमीटर लांबीची तलवार जप्त केली आणि गुन्हा दाखल केला. अनस महमुद खान (वय १८ वर्ष, रा. गौसीया मशिदीजवळ, बुद्धनगर वार्ड, बल्लारपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (ट्र्क पेटविणारे ४ आरोपी अटकेत, पोलिसांची संयुक्त कारवाई, वाचा बातमी)

बल्लारपूर तलवार आरोपी अटक : पहाटे नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीमध्ये रात्रगस्त आणि गस्त पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पोलीस हवालदार पुरुषोत्तम कैलास चिकाटे, पोलीस अंमलदार फुलचंद लोधी व शांताकुमार घोसे हे खाजगी वाहनाने गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, बुद्धनगर वार्डातील गौसीया मशिदीजवळ अनस खान नावाचा तरुण हातात उघडी धारदार तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. दोन पंचांना सोबत घेऊन पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपी अनस खान याने हातातील हत्यार बाजूला कचऱ्यात फेकून देऊन पळण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला जागेवरच ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने फेकून दिलेले शस्त्र दाखवले.

पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडी मुठ असलेली, सुमारे ७९ सेंटीमीटर लांबीची आणि सुमारे ५०० रुपये मूल्याची जुनी लोखंडी धारदार तलवार जप्त केली. बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस हवालदार पुरुषोत्तम चिकाटे यांच्या तक्रारीवरून आरोपी अनस खान याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार पंकज शिंदे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment