बल्लारपूर धारदार गुप्ती जप्त करणाऱ्या कारवाईची माहिती देणारे बल्लारपूर पोलीस ठाणे

बल्लारपूर येथे नवरात्री गस्तीदरम्यान धारदार गुप्ती जप्त; रेकॉर्डवरील आरोपीवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 12, 2026

बल्लारपूर (चंद्रपूर): शहरात नवरात्री उत्सवानिमित्त सुरू असलेल्या गस्त व सुरक्षेदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीची धारदार गुप्ती जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी बल्लारपूर शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नाग मंदिर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ट्र्क चे १७ टायर चोरीला, चालकांवर गुन्हा दाखल, वाचा हि बातमी)

बल्लारपूर धारदार गुप्ती जप्त: नाग मंदिर परिसरात कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोगदंड, पोलीस हवालदार पुरुषोत्तम कैलास चिकाटे, संतोष पंडित, मिलींद आत्राम, फुलचंद लोधी, महेश कुकुडकार आणि शांताकुमार घोसे हे नवरात्री उत्सवानिमित्त खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यादरम्यान गस्तीवर असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, नाग मंदिर जवळ, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, बल्लारपूर येथे राहणारा आणि पोलिसांच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपी धुव्वा उर्फ शाहरुख मुन्ना शेख हा आपल्या हातामध्ये एक धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांचे पथक आणि पंच नाग मंदिर परिसराजवळ पोहोचले असता, मुखबिरने सांगितल्याप्रमाणे एक इसम तेथे उभा असल्याचे दिसून आला. सदर इसमाने पोलीस वाहनाला पाहताच त्याच्या हातातील हत्यार तातडीने बाजूला फेकून दिले. पोलिसांनी तातडीने पंचांसमक्ष त्यास ताब्यात घेतले आणि त्याचे नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव धुव्वा उर्फ शाहरुख मुन्ना शेख (वय ३२, रा. डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, बल्लारपूर) असल्याचे सांगितले.

सुरुवातीला आरोपीने पोलिसांच्या विचारपूस दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून विचारणा केली असता, त्याने पंचांसमक्ष बाजूच्या कचऱ्यातील सिमेंटच्या पाइपात लपवून फेकलेले हत्यार काढून दिले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पंचनाम्यात आरोपीच्या ताब्यातून एक जुनी-पुरानी लोखंडी गुप्ती (प्लास्टिकची मूठ असलेली आणि टोकदार पात्याची धारदार हत्यार) जप्त करण्यात आली. या जप्त केलेल्या हत्याराची एकूण लांबी अंदाजे ५३ सेंटीमीटर, मुठीची लांबी १०.०५ सेंटीमीटर, मुठीपासून टोकपर्यंतची लांबी ४२.०५ सेंटीमीटर आणि पात्याची रुंदी ३ सेंटीमीटर असून त्याचे अंदाजे मूल्य ५०० रुपये आहे.

सार्वजनिक ठिकाणी लोकांमधे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना धारदार हत्यार बाळगल्याप्रकरणी आरोपी धुव्वा उर्फ शाहरुख मुन्ना शेख याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करिमा बापुजी मोरे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment