Arms Act Case Rajura प्रकरणात राजुरा पोलिसांनी धारदार सत्तूर जप्त केला

हातात सत्तूर घेऊन बाजारात फिरत होता; पुढे काय झाले?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 1, 2026

राजुरा – (Arms Act Case Rajura) प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांनी आठवडी बाजार परिसरात विनापरवाना धारदार सत्तूर घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३४ सेंटीमीटर लांबीचा लोखंडी सत्तूर जप्त करण्यात आला असून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आठवडी बाजार परिसरातील आंबेडकर शाळेजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना धारदार लोखंडी सत्तूर घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. अकील खान शमी खान (वय ४५ वर्षे, मूळ रा. उदेपानी, सिवनी, मध्य प्रदेश, सध्या रा. गोवरी रामनगर गुडा, ता. राजुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (चंद्रपुरात हुक्का तंबाखू जप्त, FDA व पोलिसांची संयुक्त कारवाई)

Arms Act Case Rajura : राजुरा पोलिसांनी आरोपीला कसा पकडले?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे हे आपल्या पोलीस पथकासह (सफौ किशोर, पोहवा रमेश, पोलीस अंमलदार राजीव) क्षेत्रात गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना एका विश्वसनीय गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राजुरा येथील आठवडी बाजार परिसरातील आंबेडकर शाळेसमोरील रस्त्यावर एक संशयास्पद इसम हातात धोकादायक हत्यार घेऊन फिरत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे ठरवले आणि वाटेत दोन पंचांना कायदेशीर सूचना देऊन सोबत घेतले. पोलीस पथक आणि पंचांनी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ पोहोचून सापळा रचला. मुखबीरने दिलेल्या वर्णनानुसार एक व्यक्ती तिथे हातात शस्त्र घेऊन फिरताना दिसताच पोलिसांनी त्याला चहुबाजूंनी वेढा घालून शस्त्रासह ताब्यात घेतले.

पोलीस पथकाने त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव अकील खान शमी खान असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेल्या शस्त्राची पाहणी केली असता, तब्बल ३४ सेंटीमीटर एकूण लांबी असलेला, ज्याच्या पात्याची लांबी २३ सेंटीमीटर आणि रुंदी ७ सेंटीमीटर होती, असा लोखंडी धारदार सत्तूर मिळून आला. सदर शस्त्र बाळगण्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याची मागणी केली, मात्र त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. तसेच गजबजलेल्या बाजारपेठेत हे शस्त्र घेऊन फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे विनापरवाना हत्यार बाळगल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी ४०० रुपये मूल्याचा तो सत्तूर पंचांसमक्ष कापडात गुंडाळून, सीलबंद करून जप्त केला. या धडक कारवाईनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर सखाराम तुमराम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment