चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जलनगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. Chandrapur Sword Terror (चंद्रपूर तलवार दहशत) या संदर्भात रामनगर पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. रेहान जमीर शेख असे आरोपीचे नाव असून, तो हातात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता.
शहरातील जलनगर परिसरात हातात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून धारदार तलवारसदृश सुरा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात महिलेकडून तब्बल ३३३ ग्राम गांजा जप्त)
Chandrapur Sword Terror प्रकरणी रामनगर पोलिसांनी रचला सापळा
शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी रामनगर पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने संशयितांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान, जलनगर वसाहतीत राहणारा रेहान जमीर शेख (वय २०) हा हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दादागिरी करत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीचा शोध घेतला.
पंचांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ४४ सेंटीमीटर लांबीचा आणि ५ सेंटीमीटर रुंदीच्या पात्याचा धारदार सुरा जप्त करण्यात आला. पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८९८/२०२६ अंतर्गत भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा रामनगर पोलिसांनी दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






