बल्लारपूर – बल्लारशाह धारदार सुरा बाळगणाऱ्या एका युवकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह शहरात २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, साईबाबा वॉर्डातील जे.बी.एस. ग्राउंड परिसरात गस्तीदरम्यान गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पंचांसमक्ष तपासणी केली. तपासणीत संबंधित युवकाच्या कमरेच्या बेल्टमध्ये धारदार सुरा आढळला. याप्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (नशामुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची मोहीम, वाचा बातमी)
बल्लारशाह धारदार सुरा प्रकरण: नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कमरेला धारदार खंजीर बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला बल्लारशाह पोलिसांनी जेरबंद केले आहे. २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास साईबाबा वार्ड येथील जे.बी.एस. ग्राउंड परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बल्लारशाह पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग व प्रतिबंधात्मक कारवाई करीत असताना, साईबाबा वार्ड येथील जे.बी.एस. ग्राउंडवर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ धारदार सुरा (खंजर) बाळगून फिरत असल्याची गोपनिय माहिती मुखबीरद्वारे मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. वर्णनानुसार संशयितरीत्या फिरत असलेल्या तरूणाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पाठीमागील बाजूस कमर बेल्टमध्ये एक लोखंडी धारदार सुरा मिळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या मोजमापात जप्त केलेल्या शस्त्राची एकूण लांबी ३५.५ सेमी असून पात्याची लांबी २३.५ सेमी आणि मुठीची लांबी १२ सेमी असल्याचे निष्पन्न झाले. या जीवघेण्या शस्त्राबाबत परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी रीतेश यशवंत सोनवणे (वय २२ वर्षे, रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर) असे नाव असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ आणि २५ सह कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, ५०० रुपये किमतीचा धारदार छुर्रा जप्त केला आहे. बल्लारशाह पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास मदत होणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






