चंद्रपूर – दक्षता जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (ACB) हा उपक्रम राबवला जाणार आहे. यंदाची संकल्पना “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” अशी आहे. ही संकल्पना केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार निश्चित झाली आहे. सप्ताहात शासकीय कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, शाळा आणि महाविद्यालयांत उपक्रम होतील. तसेच सोशल मीडियावरून जनजागृती केली जाईल. (नशामुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची मोहीम, वाचा बातमी)
दक्षता जनजागृती सप्ताह: कधी आणि कोणत्या संकल्पनेवर?
चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजगृती निर्माण करण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चंद्रपूरच्या वतीने २६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या या सप्ताहासाठी यावर्षी “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” (Probity for Prosperity) ही मध्यवर्ती संकल्पना (Theme) निश्चित करण्यात आली आहे.
या विशेष सप्ताहािमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम व जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्यक्ष संपर्कासोबतच फेसबुक, व्हॉट्सॲप, एसएमएस आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत भ्रष्टाचारविरोधी संदेश पोहोचविला जाणार आहे.
लाच मागितल्यास काय करावे? ACB चे आवाहन
भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक प्रशासनाची निर्मिती करण्यासाठी नागरिकांनी “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” ही भावना आत्मसात करून या दक्षता जनजागृती सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले आहे. शासकीय काम करताना कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची (रक्कम किंवा इतर कोणतीही मागणी) मागणी केल्यास, नागरिकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले आहे.
नागरिक तक्रारी किंवा संपर्कासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, घटक कार्यालय (सिव्हिललाईन, हुतात्मा स्मारका मागे, वरोरा नाका, चंद्रपूर) येथे संपर्क साधू शकतात. तसेच मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१, टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८३७९९५१०६४ वर संपर्क साधण्याचे तसेच dyspacbchandrapur@mahapolice.gov.in किंवा acbchandrapur@gmail.com या ईमेलवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






