Chandrapur Ganja Case Female arrest by Ramnagar Police

चंद्रपुरात महिलाही गांजा तस्करीमध्ये सक्रिय; रामनगर पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 5, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बगडखिडकी परिसरात एक मोठी कारवाई पार पडली. Chandrapur Ganja Case Female (चंद्रपूर गांजा प्रकरण महिला) या संदर्भात रामनगर पोलिसांनी ५९ वर्षीय महिलेला अटक केली आहे. जयरून नीसा इस्राईल खान पठाण असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती आपल्या घरातून अवैध गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

Chandrapur Ganja Case Female तपासात पुरवठा साखळीचा होणार उलगडा

शहरातील बगडखिडकी परिसरात घरातून अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तिच्या ताब्यातून ०.३३३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वाद मिटवायला गेलेल्या दगडाने तरुणावर हल्ला)

शहरात अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी रामनगर पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली.

दरम्यान, नुरी चौक, बगडखिडकी येथे राहणारी जयरून नीसा इस्राईल खान पठाण (वय ५९) ही आपल्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत तिच्या घरावर छापा टाकला.

झडतीदरम्यान आरोपी महिलेच्या ताब्यातून ०.३३३ किलोग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो पंचनामा करून जप्त केला आणि महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८९७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने आरोपी महिलेला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तिच्याकडे गांजा कुठून येत होता तसेच त्यामागील पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. या तपासातून अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment