Ayushman Card Distribution Chandrapur by MP Pratibha Dhanorkar

चंद्रपुरात बाळूभाऊ धानोरकर जयंतीनिमित्त आयुष्मान कार्ड वाटप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 10, 2026

चंद्रपूर : Ayushman Card Distribution Chandrapur कार्यक्रमात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते नागरिकांना आयुष्मान कार्ड प्रदान करण्यात आले. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ‘आयुष्मान कार्ड’ व ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’चे वाटप करण्यात आले. यामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळेल. (हे हि वाचा – क्रांती दिनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळाले सरप्राईज)

या योजनेमुळे गरजू नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. “आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या थेट दारापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. दिवंगत बाळूभाऊंचे सेवेचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे,” असे भावनिक आवाहन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमास काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस गटनेते नगरसेवक सुरेंद्र अडबाले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, झोन सभापती रामनरेश यादव, महिला व बालकल्याण उपसभापती सईदा बेगम ताजु शेख, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका महानंदा वाळके, नगरसेविका वैशाली महाडूळे, नगरसेविका शीला सिडाम, नगरसेविका करुणा चालखुरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment