चंद्रपूर – Chandrapur Mahatma Phule Jayanti निमित्त चंद्रपुरात पुरोगामी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक १५ सप्टेंबर रोजी गेस्ट हाऊस येथे पार पडली. सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष हिराचंद बोरकुटे अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले विचारांचा प्रसार करण्यावर बैठकीत चर्चा झाली. सामाजिक समता आणि शिक्षणावरही विचार मांडण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्री-पुरुष समानतेवर भर देण्यात आला. जातीय भेदभाव निर्मूलनासाठी जनजागृती करण्यावर चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याबाबत विचारविनिमय झाला. (हे हि वाचा – गणेश विसर्जन आपल्या दारी. मनपाने सुरु केले फिरते विसर्जन कुंड)
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी, सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. १५ सप्टेंबर रोजी गेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे पार पडली.
Chandrapur Mahatma Phule Jayanti बैठकीत कोणते मुद्दे चर्चेत?
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे होते, प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले दिशताब्दी महोत्सव समितीचे समन्वयक संजय मौर्य हे होते. या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, जातीय भेदभाव निर्मूलन तसेच समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महात्मा फुले विचारांचा प्रसार करण्यावर भर
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने शासकीय स्तरावर देश असो की राज्य कुठलाही शासकीय कार्यक्रम राबविण्यात येत नाहीये याची कंथ खंत सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली त्यासाठी शासनावर कसा दबाव बनवता येईल आणि त्याचातच स्वतंत्रपणे सर्व पुरोगामी संघटनांनी मिळून या द्विशताब्दी वर्षांमध्ये प्रबोधन आणि परिवर्तनवादी कार्यक्रमाच्या माध्यमातून तो कसा साजरा करण्यात येईल याबाबत ऊहापोह करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. विविध पुरोगामी संघटनांनी एकत्रितपणे कार्यक्रम राबविण्याची भूमिका उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडली.
या कार्यक्रमासाठी नागपूरहून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार नानाभाऊ लोखंडे गुलाबराव चिचाटे राजेंद्र पाटील
तर यवतमाळ वरून ओबीसी संघटनेचे विलास भाऊ काळे डॉ धावले सभेचे संचालन डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले
चंद्रपुरातील सत्यशोधक समाजाचे एडवोकेट प्रशांत सोनुले अरुंन धानोरकर अविनाश आंबेकर सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे श्री नरेंद्र
मराठा सेवा संघाचे महादेव धूमणे दीपक जेऊरकर दिलीप चौधरी बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर विवेक बांबोडे
समता परिषदेचे डॉक्टर संजय घाटे, बहुजन हितकारणी सभेचे बंडूभाऊ नगराळे, बाबासाहेब असोसिएशनचे एडवोकेट निरंजने एडवोकेट पूनमचंद वाकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






