चंद्रपूर – BSP Chandrapur District Meeting नुकतीच चंद्रपूर येथील पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस येथे पार पडली. या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी राजकीय व सामाजिक कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा ठरवण्यात आली.
जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत दीक्षाभूमीवरील धम्मचक्र अनुवर्तन दिन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पदवीधर नोंदणीवर सखोल चर्चा झाली. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांच्या मध्यस्थीने बुद्ध विहार आंदोलन यशस्वी)
या बैठकीचे आयोजन बसपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. रत्नाकर साठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीस जिल्हा, विधानसभा, शहर तसेच विविध स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
BSP Chandrapur District Meeting: स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्याचा निर्धार
बैठकीमध्ये आगामी दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
तसेच यावर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, स्थानिक पातळीवरील नियोजन व पुढील कार्यवाही याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला.
यासोबतच पदवीधर मतदार नोंदणी या विषयावरही विशेष चर्चा करण्यात आली. पात्र पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी करून घेण्यासाठी जनजागृती व संघटनात्मक पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीदरम्यान आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






