चंद्रपूर: Cervical Cancer Vaccine Chandrapur या भव्य मोहिमेमुळे चंद्रपूर शहरातील तरुणींच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल पडले आहे. चंद्रपुरातील ८ लॉयन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य मोहीम राबवण्यात आली. शहरातील १५ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती शिबिरे पार पडली. यामध्ये ३,५०० हून अधिक विद्यार्थिनींना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळाले. केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृती करत ६०५ विद्यार्थिनींना जीवनरक्षक लस देण्यात आली. (हे हि वाचा – चंद्रपुरात प्राजक्ता माळीची रोकडे ज्वेलर्स मध्ये एंट्री)
महिला व मुलींमध्ये वेगाने बळावणाऱ्या गर्भाशय ग्रीवा कर्करोगासारख्या (सर्व्हाइकल कॅन्सर) गंभीर आजाराविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी चंद्रपुरातील ८ लॉयन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष मोहिमेअंतर्गत ३ सप्टेंबर रोजी शहरातील १५ शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये ३,५०० हून अधिक विद्यार्थिनींना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व्हाइकल कॅन्सरची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेत तपासणीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
Cervical Cancer Vaccine Chandrapur मोहिमेतून ६०५ विद्यार्थिनींचे लसीकरण
केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करत ९ सप्टेंबर रोजी ६०५ विद्यार्थिनींना ‘एचपीव्ही’ प्रतिबंधात्मक लस (HPV Vaccine) टोचण्यात आली. ही लस गर्भाशय ग्रीवा कर्करोगापासून बचावासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.
या संपूर्ण उपक्रमाला लॉयन्स क्लब नागपूर समर्पणचे सीए अमित चांडक आणि ‘स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन’च्या डॉ. दीपिका चंडोक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन आणि लॉयन्स क्लब नागपूरचे मोलाचे सहकार्य
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपुरातील सर्व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य—पीडीजी डॉ. विलास मुळे, पीडीजी शैलेश बागला, पीएसटी समन्वयक (कोऑर्डिनेटर) अनुराधा बागला, झोन चेअरपर्सन अजय वैरागडे, विवेक भास्करवार, पुरुषोत्तम वंजारी, मनीष भंडारी, सोनिया गुप्ता, विकास घटे, कुश बागला, अशोक बंग, कविता अग्रवाल, श्रेयांश गुप्ता, सुनीता जैन, डॉ. आरती जोशी, डॉ. अरुण कुलकर्णी, ॲड. विजया बांगडे, डॉ. अपर्णा सोनवलकर, डॉ. नीलिमा मुळे, डॉ. संध्या कुलकर्णी, पल्लवी भास्करवार, डॉ. कीर्ती साने, श्याम धोपटे, अंजू गोयल, राज पुगलिया, स्मिता जीवतोडे, अभिषेक बागला, प्रियंका वंजारी, कविता टहिल्यानी, लक्ष्मी अग्रवाल, उमा जैन, शकुंतला अग्रवाल, मीनाक्षी जोगी, भारती कुरेकर, सरिता घटे आणि खुशबू बागला यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडू शकला. या भगीरथ मोहिमेच्या यशाचे संपूर्ण श्रेय पीएसटी समन्वयक अनुराधा बागला यांना जाते.
या सामाजिक उपक्रमात चंद्रपुरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लॉयन्स क्लबने मुलींच्या आरोग्यासाठी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि राबवलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






