रोकडे ज्वेलर्स ऑफर: दिवाळीनिमित्त सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्ज सवलत

रोकडे ज्वेलर्स ऑफर: दिवाळीनिमित्त सोन्या-हिऱ्यांच्या मेकिंग चार्जवर मोठी सवलत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 5, 2026

नागपूर/ चंद्रपूर – रोकडे ज्वेलर्स ऑफर अंतर्गत धनत्रयोदशी आणि दिवाळीनिमित्त सोन्या-चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जमध्ये मोठी सवलत जाहीर झाली आहे. रोकडे ज्वेलर्स (ऑफर) ने दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वैध आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शाखांमध्ये ती उपलब्ध आहे. २२ कॅरेटवर ४० टक्के, १८ कॅरेटवर ६० टक्के आणि डायमंड ज्वेलरीवर १०० टक्के मेकिंग सूट देण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (४ जणांची शिकार करणारा त्रिशूल वाघ जेरबंद, वाचा बातमी)

रोकडे ज्वेलर्स ऑफर: कोणत्या दागिन्यांवर किती सवलत?

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून विदर्भातील नामांकित व प्रतिष्ठित ‘रोकडे ज्वेलर्स’तर्फे ग्राहकांसाठी विशेष ‘G.O.A.T.’ मेगा ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. सन १९०२ पासून विश्वास आणि परंपरेचा वारसा जपणारा हा ब्रँड या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक सवलती घेऊन आला आहे.

२२ आणि १८ कॅरेटवरील मेकिंग चार्ज सूट

या विशेष ऑफरअंतर्गत रोकडे ज्वेलर्स (ऑफर)तर्फे २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर (घडणाव) थेट ४० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, आधुनिक व ट्रेंडी डिझाइन्सची आवड असलेल्या ग्राहकांसाठी १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर तब्बल ६० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, हिऱ्यांचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर १०० टक्के सूट (कोणताही घडणाव आकारला जाणार नाही) देण्यात येत असून, जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर ग्राहकांना १०१ टक्के मूल्याचा विशेष लाभ दिला जात आहे.

ग्राहकांच्या पारदर्शकतेसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करताना कोणताही अतिरिक्त सरचार्ज किंवा छुपे शुल्क आकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही विशेष ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वैध असणार आहे.

नागपूरमधील महाल, लक्ष्मीनगर, इतवारी, हिंगणा रोड, कोराडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नुकत्याच सुरू झालेल्या गडचिरोली शाखेमध्ये ही ऑफर उपलब्ध आहे.

“दागिने हे केवळ वस्तू नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक आहेत. विदर्भातील ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांचा सण अधिक आनंददायी करण्यासाठी ही विशेष ऑफर सादर केली आहे,” असे रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश रोकडे यांनी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment