चंद्रपूर: Rokde Jewellers new showroom चंद्रपूर शहरातील गिरनार चौक येथे सुरू झाले आहे. १२४ वर्षांचा विश्वास लाभलेले हे विदर्भातील सर्वात मोठे बहुमंजली दालन आहे. १५ सप्टेंबर रोजी या दालनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला रोकडे परिवारासह शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांसाठी सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर भरघोस सूट जाहीर झाली आहे. चंद्रपूरच्या सुवर्ण बाजारपेठेत या नवीन शोरूममुळे आधुनिक खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. (हे हि वाचा – १२४ वर्षाचा विश्वास आता चंद्रपुरात))
Rokde Jewellers new showroom: गिरनार चौकात विदर्भातील सर्वात मोठे दालन
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर साकार झाला असून दागिन्यांच्या दुनियेत १२४ वर्षांहून अधिक काळाचा विश्वास आणि पाच पिढ्यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या नामांकित ‘रोकडे ज्वेलर्स’ने चंद्रपुरात आपले नवीन भव्य बहुमंजली शोरूम सुरू केले आहे. चंद्रपूर शहरातील प्रमुख भाग असलेल्या गिरनार चौक येथे २५ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेत साकारण्यात आलेले हे शोरूम विदर्भातील सर्वात मोठे ज्वेलरी शोरूम ठरले आहे.
१५ सप्टेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात या शोरूमचा औपचारिक शुभारंभ रोकडे कुटुंबाचे ज्येष्ठ स्तंभ श्री. भैय्याजी रोकडे आणि श्रीमती वंदना भैय्याजी रोकडे यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने पार पडला. याप्रसंगी रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश रोकडे, संचालक श्री. सारंग रोकडे, श्री. पारस रोकडे, संचालिका श्रीमती अनामिका रोकडे, श्रीमती संस्कृती रोकडे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज, मान्यवर नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.
या नवीन शोरूममध्ये ग्राहकांसाठी गोल्ड, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्राइडल आणि फाईन सिल्वर ज्वेलरीचे एकापेक्षा एक आधुनिक आणि पारंपरिक डिझाइन्सचे अथांग कलेक्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये २२ कॅरेट हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ अवघ्या ५ टक्क्यांपासून सुरू असून, दैनंदिन वापरासाठी १८ कॅरेट प्लेन गोल्ड दागिन्यांची विदर्भातील सर्वात मोठी शृंखला मांडण्यात आली आहे. याशिवाय सर्वसामान्यांना परवडणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांची सुरुवातीची किंमत केवळ १९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली असून, दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी शोरूममध्ये अत्याधुनिक कॅरेटमीटर मशिन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या ऐतिहासिक पर्वाचा भाग म्हणून रोकडे ज्वेलर्सने महाराष्ट्राची लाडकी जोडी, अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना आपले अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर घोषित केले आहे.
उद्घाटन विशेष ऑफर्स: दागिने घडणावळीवर ५०% ते १००% पर्यंत सूट
शोरूमच्या उद्घाटनानिमित्त १५, १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, ग्राहकांना सोने व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ५० टक्के सूट, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के पूर्ण सूट दिली जात आहे; तसेच प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी २५ टक्के अॅश्युअर्ड गिफ्ट वाउचरही दिले जात आहे. या तीन दिवसीय महोत्सवात १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी, तर १७ सप्टेंबर रोजी चित्रपट अभिनेत्री ईशा तलवार यांची खास उपस्थिती राहणार आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी शोरूममध्ये २ हजार ५०० स्क्वेअर फुटांचा सुसज्ज मल्टिपर्पज हॉल, सुरक्षिततेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था, शोरूमपासून ६०० मीटर अंतरावर स्वतंत्र पार्किंग लॉट आणि १० व्हॅले पार्किंग सहाय्यक तैनात करण्यात आले असून, बचतीसाठी सहा नवीन ज्वेलरी बाइंग प्लॅन्सही सुरू करण्यात आले आहेत. १२४ वर्षांचा विश्वास आणि पारदर्शकता पुढे नेत चंद्रपूरकरांच्या सेवेत हे भव्य दालन दाखल झाले असून नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






