Padoli Cattle Smuggling News police seized pickup vehicle and cattle

चंद्रपूर पडोलीत गोवंशाची अवैध वाहतूक पकडली; ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 15, 2026

चंद्रपूर: Padoli Cattle Smuggling News: चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका बोलेरो पिकअप वाहनातून तीन गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाची झडती घेतली. यावेळी वाहनासह ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात घुग्घूस येथील चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात डीजेवर पोलिसांचा हातोडा)

Padoli Cattle Smuggling News: पोलिसांचा अवैध वाहतुकीवर धडक छापा

जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली असून, पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित वाहनावर धाडसी कारवाई करण्यात आली आहे. बोलेरो पिकअप वाहनातून अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीररीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी वाहन आणि जनावरांसह तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात घुग्घूस येथील एका वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध विविध कठोर कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिकअपमध्ये तीन जनावरांची अत्यंत अमानुषपणे कोंबाकोंब

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका पिकअप वाहनातून गोवंशाची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची कसून तपासणी केली असता, त्या वाहनामध्ये अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने कोंबलेली तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, हालचालही करता येणार नाही अशा पद्धतीने बांधून त्यांची विनापरवाना अवैध वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनातील तिन्ही गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेली तीन जनावरे आणि पिकअप वाहन असा एकूण अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पंचनाम्यासह जप्त केला.

या प्रकरणात बोलेरो पिकअपचा चालक अनिमुद्दीन गुलबुद्दीन शेख (वय २४ वर्षे, रा. शिवनगर वॉर्ड, घुग्घूस, ता. जि. चंद्रपूर) याला जाब विचारला असता, जनावरांच्या वाहतुकीबाबत कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) चे सहकलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ही जनावरे कुठून आणली जात होती आणि ती कत्तलीसाठी कुठे पोहोचवली जाणार होती, तसेच या अवैध तस्करीमागे आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, या दिशेने पडोली पोलीस आता सखोल तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment