मूल (चंद्रपूर): Mul Cattle Smuggling Seizure प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजा बेंबाळ पोलीस चौकीसमोरील मार्गावर नाकाबंदी करून ८ वाहने जप्त करण्यात आली.
या कारवाईत २४ गोवंशीय बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वाहनांसह एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. पोलिसांनी ८ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. (हे हि वाचा – मामा म्हणून हाक मारली आणि त्याने नको ते कृत्य केलं)
Mul Cattle Smuggling Seizure : बेंबाळ चौकीजवळ पोलिसांची धडक कारवाई
गोवंशीय जनावरांची कत्तल व विक्री करण्याच्या उद्देशाने अमानुषपणे आणि विना चारा-पाणी वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा तस्करांच्या टोळीवर मूल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता मौजा बेंबाळ पोलीस चौकीसमोरील मार्गावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी तब्बल ८ बोलेरो पिकअप वाहने अडवून २४ गोवंशीय बैलांची सुखरूप सुटका केली. या धडक कारवाईत वाहने व जनावरांसह एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य रस्त्यावर सापळा रचून नाकाबंदी
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने मौजा बेंबाळ पोलीस चौकीसमोरील मुख्य रस्त्यावर सापळा रचून नाकाबंदी सुरू केली. नाकाबंदी दरम्यान एकापाठोपाठ येणारी आठ बोलेरो पिकअप वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने कोंबलेले गोवंशीय बैल आढळून आले. वाहनांमध्ये जनावरांना कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता, त्यांना वेदना पोहोचतील अशा पद्धतीने बांधून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
८ बोलेरो पिकअपसह ४५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचे २४ गोवंशीय बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेली ४० लाख रुपये किमतीची ८ बोलेरो पिकअप वाहने, असा एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पिकअप वाहनचालक महेश देवीदास फटींग (वय ३७, रा. कुंझा), किशोर सेवक नागपुरे (वय ३८, रा. बोंडेगाव), विक्की धनपाल देशमुख (वय २८, रा. वेडवा), अंकुश देवराव मेंढुले (वय ४८, रा. पवनी), दीपक यादव चुनरी (वय ४२, रा. व्याहाड खुर्द), दीपक योगराज कांबळे (वय २५, रा. किटाळी), दिगंबर मंगरू मुनघाटे (वय ३६, रा. आंबेशिवणी) आणि राहुल मोरेश्वर चौधरी (वय ३६, रा. चकपिरंजी) या आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(क), ९ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(डी)(एच) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार इदल राठोड करत आहेत.
ही धडक कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे, उमेश पिपरे, व्यंकटेश दोनोंडे, पोलीस हवालदार इदल राठोड, सुनील कुळमेथे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, नरेंद्र वाकडे, प्रकाश चिकराम, शंकर बोरसरे आणि प्रमोद सावलसाकडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे अवैध गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






