गडचिरोली: गडचिरोली रोकडे ज्वेलर्स शोरूम – मध्य भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रोकडे ज्वेलर्स’चे गडचिरोली शहरात नवीन आणि अत्यंत भव्य शोरूम सुरू होत आहे. तब्बल ५ पिढ्यांपासून चालत आलेल्या आणि १२४ हून अधिक वर्षांच्या अखंड परंपरेचा वारसा लाभलेला हा ब्रँड गडचिरोलीकरांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. चंद्रपूर-मूल रोड, गडचिरोली येथे स्थित हे भव्य शोरूम येत्या १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून तीन दिवसीय उद्घाटन सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. समर्पित पार्किंग क्षेत्रासह ३,६०० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले हे शोरूम गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक दागिने खरेदीचे केंद्र ठरणार आहे. अशी माहिती रोकडे ज्वेलर्सच्या संचालकांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (विनापरवाना डीजे वाजला आणि गुन्हा दाखल, वाचा बातमी)
गडचिरोली रोकडे ज्वेलर्स शोरूम : कुठे आणि कधी उद्घाटन?
या ऐतिहासिक विस्ताराचे आणि नव्या युगाचे नेतृत्व प्रमोटर श्री. भैयाजी रोकडे, श्रीमती वंदना भैयाजी रोकडे, व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. राजेश भैयाजी रोकडे, संचालक श्री. सारंग भैयाजी रोकडे, संचालक श्री. पारस राजेश रोकडे, तसेच प्रमोटर श्रीमती अनामिका राजेश रोकडे आणि श्रीमती संस्कृती सारंग रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. या भव्य सोहळ्यात ग्लॅमर आणि तारकांचे आकर्षण जोडण्यासाठी टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय, पुरस्कार विजेती आयकॉन आणि गाजलेल्या ‘बिग बॉस’ रिॲलिटी शोची विजेती ठरलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे उद्घाटनाची शोभा वाढवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी विशेष उपस्थित राहणार आहे. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना रोकडे ज्वेलर्सचे अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले असून, “महाराष्ट्राचे भाऊ आणि वाहिनी” म्हणून ओळखली जाणारी ही जोडी विश्वास, कौटुंबिक मूल्ये व आधुनिकतेचे प्रतीक म्हणून जोडली गेली आहे.
नवीन ज्वेलरी बाइंग प्लॅन्स
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी म्हणून रोकडे ज्वेलर्सने सोन्याचे दागिने पुन्हा बजेटमध्ये आणले आहेत. यादरम्यान २२ कॅरेट गोल्ड ज्वेलरीवर घडणावळ (Making Charges) अवघ्या ५% पासून सुरू होणार असून, ग्राहक सर्टिफाइड आणि हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करू शकतील. तसेच, नवीन पिढीच्या ग्राहकांसाठी हलके, मजबूत आणि दैनंदिन जीवनशैलीला साजेसे १८ कॅरेट प्लेन गोल्ड ज्वेलरीचे विदर्भातील सर्वात मोठे कलेक्शन सादर केले जात आहे. आगामी महिन्यांच्या खरेदीसाठी दुर्मिळ डायमंड मास्टरपीस, एक्सक्लूसिव्ह पोलकी क्रिएशन, सिग्नेचर ब्रायडल कलेक्शन आणि लिमिटेड एडिशन डिझायनर ज्वेलरी उपलब्ध असणार आहे.
उद्घाटन ऑफर्स कोणत्या?
उद्घाटन सोहळ्यानिमित्त १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी लागू असणाऱ्या एक्सक्लूसिव्ह इनॉग्युरल ऑफर्समध्ये सोन्या व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) फ्लॅट ५०% सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट १००% ची पूर्ण सूट (100% OFF), तसेच प्रत्येक खरेदीवर मेकिंग चार्जेसवर २५% अॅश्युअर्ड गिफ्ट वाउचर दिले जाणार आहे, जे पुढील खरेदीवर रिडीम करता येईल. याशिवाय, २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर विशेष घडणावळ ५% पासून सुरू, राशिरत्न क्रय सुरक्षा योजनेअंतर्गत २१ दिवसांचा ट्रायल पिरियड व मनी बॅक गॅरंटी, १९,९९९ रुपयांपासून सुरू होणारी परवडणारी डायमंड रेंज, १८ कॅरेट येलो गोल्डचे मॉर्डन कलेक्शन आणि ग्राहकांच्या सुलभ बचतीसाठी गोल्ड बाइंग प्लॅन, डिजिटल गोल्ड प्लॅन, मंथली इन्स्टॉलमेंट प्लॅन, गोल्ड एक्स्चेंज अँड अपग्रेड प्लॅन, फ्युचर वेडिंग प्लॅन आणि डायमंड अँड सिल्वर स्पेशल प्लॅन अशा ६ नवीन ज्वेलरी बाइंग प्लॅन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे १० यशस्वी शोरूम चालविल्यानंतर गडचिरोलीतील या नवीन फ्लॅगशिप शोरूममुळे रोकडे ज्वेलर्सच्या शोरूमची संख्या वाढणार असून, आगामी ३ महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यातही नवीन शोरूम सुरू झाल्यावर एकूण संख्या १२ होईल. तसेच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही विस्ताराची योजना आहे. ग्राहक सुरक्षा आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी अत्याधुनिक कॅरेटमीटर मशीन्स, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, कडक सुरक्षा यंत्रणा, जुने सोने वितळवण्याच्या प्रक्रियेचे रेकॉर्डिंग आणि टॅक्स इनव्हॉइसमध्ये तपशीलवार माहिती देण्याची पारदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या १२४ वर्षांहून अधिक काळ लाखो कुटुंबांच्या विश्वासाचे प्रतीक बनलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात व ३-दिवसीय उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोकडे ज्वेलर्सच्या वतीने गडचिरोलीतील नागरिकांना करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






