ब्रह्मपुरी (चंद्रपूर): ब्रह्मपुरी फरार आरोपी अटक प्रकरणात पोलिसांना तब्बल २२ वर्षांनंतर मोठे यश मिळाले आहे. २००४ मधील पत्नीवरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी रमेश झिंगुजी खानोरकर (रा. कूर्झा, ब्रह्मपुरी) याला पोलिसांनी अटक केली. तो नागपूर जिल्ह्यातील नरसाळा येथे ओळख लपवून राहत होता. गुप्त माहितीच्या आधारे १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी कारवाई केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ आणि ३२६ अन्वये ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. (विनापरवाना डीजे वाजला, पोलिसांनी थेट डीजे केला जप्त, वाचा हि बातमी)
ब्रह्मपुरी फरार आरोपी अटक: २००४ च्या गुन्ह्याची पार्श्वभूमी
घटनाक्रमाची पार्श्वभूमी पाहता, वर्ष २००४ मध्ये ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ आणि ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रमेश खानोरकर याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. हा गंभीर गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलीस तपासाला हुलकावणी देत फरार झाला होता. न्यायालयाने त्याला कायदेशीररित्या ‘फरार’ घोषित केले होते. मागील २२ वर्षांपासून ब्रह्मपुरी पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते, परंतु पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरत होता.
२२ वर्षे ओळख लपवून एकटाच वास्तव्य
दरम्यान, अलीकडेच ब्रह्मपुरी पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती मिळाली. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील मौजा नरसाळा येथे मागील काही वर्षांपासून एक इसम पूर्णपणे एकटाच राहत असून त्याच्याकडे कोणीही नातेवाईक येत नाही आणि तो देखील कोणाच्या संपर्कात नसतो, अशी कुणकुण लागली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत आणि हुशारीने या इसमाची कुंडली गोळा करण्यास सुरुवात केली. सखोल चौकशीअंती हा इसम इतर कोणी नसून २२ वर्षांपूर्वी ब्रह्मपुरीत पत्नीवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेला रमेश झिंगुजी खानोरकरच असल्याची खात्री पटली. गेल्या २२ वर्षांपासून तो आपले नाव आणि खरी ओळख बदलून नरसाळा (ता. कन्हान, जि. नागपूर) येथे लपूनछपून राहत असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीला पोलिसांच्या हालचालींचा आणि संशयाचा सुगावा अजिबात लागला नाही, याची पूर्ण काळजी घेत पोलिसांनी सापळा रचण्याचे ठरवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नरसाळा येथील त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावर अचानक धाड टाकून त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आज रोजी त्याला अधिकृतपणे अटक केली असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.
सदर यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. आयुश नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहील झरकर आणि पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्यासह पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम आणि पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, निलेश तूमसरे, स्वप्नील पळसपगार व वशिष्ठ रंगारी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत ही धडक कारवाई फत्ते केली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






