चंद्रपूर: Prajakta Mali Chandrapur Visit मुळे चंद्रपूर शहर आणि सांस्कृतिक वर्तुळात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी रोकडे ज्वेलर्सच्या नवीन बहुमजली दालनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवली. गिरणार चौकातील या भव्य दालनात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत नवीन दालनाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सुवर्ण दालनामध्ये नागरिकांसाठी खास ऑफर्सची रेलचेल सुरू आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात आता फिरते विसर्जन कुंड, चंद्रपूर मनपाचा पुढाकार)
Prajakta Mali Chandrapur Visit मुळे उद्घाटन सोहळ्याला लाभली विशेष शोभा
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूरच्या पावन भूमीत सुवर्ण आणि रत्न आभूषणांच्या विश्वात १२४ वर्षांहून अधिक काळाची परंपरा जपणाऱ्या ‘रोकडे ज्वेलर्स’च्या भव्य बहुमजली दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाच पिढ्यांचा समृद्ध वारसा आणि ग्राहकांचा अढळ विश्वास सोबत घेऊन सुरू झालेल्या या शोरूमच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशीही (१६ सप्टेंबर) संपूर्ण परिसरात चैतन्यमय आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे महाराष्ट्राची लाडकी आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी हिच्या अलौकिक उपस्थितीने या उद्घाटन सोहळ्याची शोभा अधिकच द्विगुणित केली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर नागरिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद लुटला.
गिरणार चौकातील रोकडे ज्वेलर्सच्या बहुमजली दालनाचा शानदार शुभारंभ
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गिरणार चौकात हे भव्य बहुमजली दालन साकारण्यात आले असून, हे केवळ दागिन्यांच्या खरेदीचे केंद्र नसून ग्राहकांना आधुनिकता आणि परंपरेचा एक अनोखा संगम घडवून देणारे दालन ठरले आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासूनच रोकडे परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक भैयाजी रोकडे व वंदना रोकडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी रोकडे ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश भैयाजी रोकडे, डायरेक्टर सारंग भैयाजी रोकडे, डायरेक्टर पारस राजेश रोकडे, डायरेक्टर अनामिका राजेश रोकडे आणि संस्कृती सारंग रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी रोकडे परिवाराच्या या नव्या सुवर्ण प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पाच पिढ्यांची परंपरा आणि १२४ वर्षांचा सुवर्ण वारसा
ग्राहकांशी संवाद साधताना रोकडे ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश रोकडे यांनी चंद्रपूरकरांच्या आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, चंद्रपूरच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत आई महाकालीच्या आशीर्वादाने रोकडे ज्वेलर्सचे हे नवीन दालन सुरू करणे म्हणजे केवळ व्यवसायाचा विस्तार नसून येथील प्रत्येक कुटुंबाशी घट्ट नाते जोडण्याचा हा संकल्प आहे. पाच पिढ्यांचा विश्वास, शुद्धतेची परंपरा आणि आधुनिक डिझाईन्सचा अनोखा संगम चंद्रपूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांचा हाच विश्वास ही आमची खरी ताकद असून, येथील प्रत्येक ग्राहकाला जागतिक दर्जाच्या दागिन्यांसह एक अविस्मरणीय आणि प्रीमियम खरेदीचा अनुभव देणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. विवाह सोहळे, सण-उत्सव आणि कौटुंबिक आनंदाच्या क्षणांसाठी आता चंद्रपूरकरांना स्वतःच्याच शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुवर्ण, हिरे आणि चांदीचे दागिने उपलब्ध झाले आहेत.
ग्राहकांसाठी घडणावळीवर ५० ते १०० टक्के विशेष सवलती
नवीन दालनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने रोकडे ज्वेलर्सतर्फे १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक ऑफर्स आणि योजनांची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सोने व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) ५० टक्के थेट सूट, तर डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर १०० टक्के सूट देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी घडणावळीवर २५ टक्के डिस्काउंट व्हाऊचरही दिले जात आहे. विशेष म्हणजे, २२ कॅरेटच्या हॉलमार्क आणि सर्टिफाइड दागिन्यांची घडणावळ अवघ्या ५ टक्क्यांपासून सुरू होत असून, १८ कॅरेटच्या मजबूत आणि वजनाने हलक्या दागिन्यांचे विदर्भातील सर्वात मोठे कलेक्शन येथे उपलब्ध आहे. तसेच डायमंड ज्वेलरीची सुरुवातीची किंमत केवळ ₹१९,९९९/- असून, राशिरत्नांसाठी २१ दिवसांची ट्रायल आणि मनी बॅक गॅरंटी योजना लागू करण्यात आली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी रोकडे ज्वेलर्सने गोल्ड बाइंग प्लॅन, डिजिटल गोल्ड प्लॅन, मंथली ज्वेलरी इन्स्टॉलमेंट प्लॅन, गोल्ड एक्सचेंज अँड अपग्रेड प्लॅन, फ्युचर वेडिंग अँड ओकेजन प्लॅन तसेच डायमंड अँड सिल्व्हर स्पेशल प्लॅन अशा सहा वैशिष्ट्यपूर्ण बचत योजनाही आणल्या आहेत.
या नवीन दालनात दागिन्यांच्या खरेदीव्यतिरिक्त ग्राहकांच्या सुविधेसाठी विविध आधुनिक सोयीसुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये २,५०० चौरस फुटांचा एक भव्य मल्टी-पर्पज हॉल तयार करण्यात आला असून, हा हॉल किटी पार्टी, महिलांचे मेळावे, कॉर्पोरेट बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी सर्व आधुनिक सुविधांसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या सुलभतेसाठी सुटसुटीत आणि प्रशस्त पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, या उद्घाटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी, भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा तलवार या दालनाला विशेष भेट देऊन चंद्रपूरकरांच्या भेटीस येणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






