भाऊंचा गरबा मूल येथे दांडिया खेळताना मूलवासी आणि मंचावरील मान्यवर

मूलमध्ये ‘भाऊंचा गरबा’ उत्सव; अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 19, 2026

मुल – भाऊंचा गरबा मूल येथे स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या दांडिया उत्सवात मूलवासीयांनी गरब्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाला आ. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचे मूलवासीयांतर्फे स्वागत करण्यात आले. मुनगंटीवार यांनी नारीशक्तीच्या सन्मानाचा आणि मुलींच्या सुरक्षेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. (नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी ३० फुटाचा पिंजरा, वाचा बातमी)

भाऊंचा गरबा मूल येथे कसा रंगला

नवरात्रीचा उत्साह, गरब्याच्या तालावर थिरकणारी पावले आणि संस्कृतीच्या रंगांनी सजलेला आसमंत अशा आनंदमय वातावरणात मुल येथे स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समितीच्या वतीने आयोजित ‘भाऊंचा गरबा’ दांडिया उत्सव रंगला. या सोहळ्याला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचे वाघांच्या भूमीत आगमनानिमित्त मूलवासीयांच्या वतीने स्वागत केले.नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त मूलवासीयांना शुभेच्छा देतानाच या देखण्या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या आयोजकांचे आ.मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. मूलवासीयांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या मनातील समाधान पाहून आनंद वाटतो, अशी भावना व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मूल ही थोर माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची भूमी आहे. या भूमीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भारत-चीन युद्धाच्या काळात देशासाठी सुवर्णदान करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. देशाप्रती समर्पणाची भावना, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान ही आपल्या भूमीची ओळख आहे. मूलवासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या मनातील समाधान पाहून मन प्रसन्न होते, असे त्यांनी नमूद केले.

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, शक्तीची उपासना करण्यासोबतच नारीशक्तीचा सन्मान करण्याची प्रेरणा देणारा पवित्र पर्व आहे. स्त्रीच्या सन्मानातूनच कुटुंब, समाज आणि राष्ट्राची प्रगती साध्य होते. त्यामुळे या नवरात्रोत्सवात प्रत्येकाने नारी सन्मानाचा संकल्प करावा. नारीशक्ती ही समाजाच्या प्रगतीचा भक्कम आधार असून, महिलांना सन्मान आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. स्त्रीचा सन्मान हा केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता तो आपल्या कृतीतूनही व्यक्त झाला पाहिजे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘भाऊंचा गरबा’ या उत्सवाच्या माध्यमातून मूलच्या सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी मिळाली. गरब्याचा उत्साह, नवरात्रोत्सवाचा आनंद आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

सुधीरभाऊंकडून खूप काही शिकण्यासारखे !

मूल येथे येण्याची आणि सर्वांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल मी सुधीरभाऊंचे आभार मानते. मूल येथे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. भाऊंच्या घरी गेल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने माझे स्वागत केले. त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान असून, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.आजच्या काळात मुलींनी निर्भयपणे घराबाहेर पडून आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत प्रार्थना बेहेरे यांनी व्यक्त केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment