चंद्रपूर: Rokde Jewellers Chandrapur शहरातील गिरनार चौक येथे आपले नवे दालन सुरू करत आहे. १५ सप्टेंबरपासून हे भव्य दालन ग्राहकांसाठी खुले होईल. आज चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत संचालकांनी ही अधिकृत घोषणा केली. उद्घाटनानिमित्त ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरात सागवाणापासून बनलेले आकर्षक वस्तूंचे फिरते विक्री केंद्र)
तसेच १५, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी टीव्ही सेलिब्रिटींची उपस्थिती राहील. चंद्रपूरकरांसाठी जागतिक दर्जाचा खरेदीचा अनुभव येथे उपलब्ध होणार आहे.
Rokde Jewellers Chandrapur : गिरनार चौकात विदर्भातील सर्वात मोठे दालन
विदर्भातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह मानले जाणारे ‘रोकडे ज्वेलर्स’ आता चंद्रपूर शहरात आपल्या नव्या आणि भव्य दालनाचा शुभारंभ करत असून, येत्या १५ सप्टेंबरपासून हे दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर येथे रोकडे ज्वेलर्सच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत रोकडे ज्वेलर्सचे संचालक व प्रमुख पदाधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नवीन दालनाची वैशिष्ट्ये, ग्राहकांसाठीच्या योजना आणि भव्य उद्घाटन सोहळ्याची सविस्तर माहिती दिली.
१२४ वर्षांची विश्वासार्ह परंपरा आता चंद्रपूरकरांच्या सेवेत
रोकडे ज्वेलर्सच्या या ऐतिहासिक विस्ताराविषयी माहिती देताना प्रवर्तक श्री. भाईजी रोकडे, सौ. वंदना भाईजी रोकडे, संचालक राजेश रोकडे, सौ. अनामिका रोकडे, सौ. संस्कृती रोकडे, तसेच योगेश रोकडे, पारस रोकडे आणि सारंग रोकडे यांनी सांगितले की, रोकडे ज्वेलर्सला तब्बल १२४ वर्षांची अखंड आणि विश्वासार्ह परंपरा लाभलेली आहे. ही शुद्धतेची आणि विश्वासाची परंपरा चंद्रपूरकरांच्या सेवेत आणण्यासाठी गिरनार चौक, चंद्रपूर येथे विदर्भातील सर्वात मोठ्या ज्वेलरी शोरूमची उभारणी करण्यात आली आहे. या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला असून हा उद्घाटन उत्सव १५, १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ असे सलग तीन दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.
मंगळवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य उद्घाटन सोहळा
पत्रकार परिषदेत माहिती देताना संचालकांनी स्पष्ट केले की, १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या तीन दिवसीय सोहळ्यात टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध स्टार्स तेजस्वी प्रकाश, प्राची देसाई, प्राजक्ता माळी,ईशा तलवार आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची विशेष उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी भाईजी रोकडे, सौ. वंदना भाईजी रोकडे यांच्या हस्ते या भव्य दालनाचे उदघाटन होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत स्टार कलाकारांची उपस्थिती राहील. रोकडे परिवाराने पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून ऋग्वेद रोकडे आणि सौ. दिशा रोकडे यांची या नवीन दालनाचे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. आजच्या तरुण पिढीच्या आवडीनिवडी, आधुनिक फॅशन ट्रेंड्स आणि पारंपरिक मूल्यांचा उत्तम मेळ साधत हे युवा संचालक चंद्रपूरकरांना जागतिक दर्जाचा खरेदीचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर भव्य मेकिंग सूट
या नवीन दालनामध्ये चंद्रपूरकरांसाठी १०० टक्के हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने, अस्सल हिऱ्यांचे विविध प्रकार, पोलकी, कुंदन, तसेच अँटिक दागिन्यांची विस्तृत आणि भव्य श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भात पहिल्यांदाच १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे सर्वात मोठे कलेक्शन येथे पाहायला मिळणार असून, या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस केवळ ५ टक्क्यांपासून सुरू होणार आहेत. तसेच नेहमीच्या २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवरही मेकिंग चार्जेसवर थेट ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर मेकिंग चार्जेस पूर्णपणे मोफत म्हणजेच फ्लॅट १०० टक्के सूट (100% OFF) दिली जाणार आहे. याशिवाय २५ टक्के अॅश्युअर्ड गिफ्ट व्हाउचरचा लाभ मिळणार असून ग्राहकांना प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीवर मिळणारे हे व्हाउचर पुढील दागिन्यांच्या खरेदीवर वळते करून घेता येईल, ही सवलत केवळ उद्घाटन काळातील १५, १६ आणि १७ सप्टेंबर या तीन दिवसांपुरतीच लागू असणार आहे. येथे ब्रँडेड ब्रायडल ज्वेलरी, सिग्नेचर कलेक्शन, पुरुषांचे दागिने, खास लहान मुलांसाठी डिझाइन केलेले दागिने आणि दैनंदिन वापरासाठी हलके दागिने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील.
ग्राहकांच्या सुरक्षेला आणि विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देत या भव्य शोरूममध्ये ग्राहकांना आपल्याकडील सोन्याची शुद्धता थेट स्वतः तपासता यावी यासाठी अत्याधुनिक कॉम्प्युटराइज्ड ‘कॅरेटमीटर’ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि विस्तीर्ण पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली असून, सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही निगराणी, बाउन्सर्स आणि स्थानिक पोलिसांचे सहकार्य लाभणार आहे.
नागपूरमध्ये सध्या ८ भव्य दालने यशस्वीरीत्या कार्यरत असताना, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांसह नजीकच्या तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरातील ग्राहकांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील दागिने खरेदीचा अनुभव या दालनामुळे घेता येणार आहे. आगामी काळात अमरावती, वर्धा, वाशीम, भंडारा, गोंदिया आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्याचे नियोजनही रोकडे ज्वेलर्सने आखले आहे. चंद्रपूर आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या तीन दिवसीय उद्घाटन सोहळ्याचा प्रत्यक्ष लाभ घ्यावा, असे आवाहन रोकडे ज्वेलर्सच्या व्यवस्थापनाकडून पत्रकार परिषदेच्या शेवटी करण्यात आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






