MahaDBT Scholarship Portal Chandrapur pending application deadline notice

महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांसाठी १५ सप्टेंबर अंतिम मुदत; समाज कल्याण विभागाचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 12, 2026

चंद्रपूर : MahaDBT Scholarship Portal Chandrapur वरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी पोर्टल सक्रिय राहणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्जांचा यात समावेश आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाने ही माहिती दिली.

त्रुटींची पूर्तता विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यास समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही. (हे हि वाचा – चंद्रपुरात सागवान पासून बनलेल्या वस्तूंचे फिरते विक्री केंद्राचे उदघाटन)

MahaDBT Scholarship Portal Chandrapur वर अर्ज दुरुस्तीची शेवटची संधी

शैक्षणिक वर्ष 2023-24, 2024-25 आणि 2025-26 मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी 1.0 पोर्टल 15 सप्टेंबर 2026 पर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबतची आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थी स्तरावरील त्रुटींची दुरुस्ती करून संबंधित अर्ज पुनःप्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर करावेत.

विद्यार्थी स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित विद्यार्थी व पालकांनी अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करून 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यामुळे अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी व पालकांची राहील. यासाठी समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन अर्ज तसेच नवीन अर्जदारांची नोंदणी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती तसेच प्रोफाइल नियमितपणे अद्ययावत ठेवावे.

महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील जुन्या शैक्षणिक वर्षांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या या अंतिम मुदतीचा लाभ घेऊन विद्यार्थी, पालक आणि संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही 15 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment