Engineering Scholarship Chandrapur करिअर मार्गदर्शन कार्यक्रम चंद्रपूर

Engineering Scholarship Chandrapur । चंद्रपुरात ३ जूनला भव्य करिअर मार्गदर्शन व शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रम

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 2, 2026

Engineering Scholarship Chandrapur : चंद्रपूर – बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘कोश्यस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या वतीने चंद्रपूर येथे भव्य ‘शिष्यवृत्ती माहिती, अभियांत्रिकी प्रवेश व करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम ३ जून रोजी चंद्रपुरातील ग्रँड आयकॉन (Grand Icon) हॉटेलमध्ये पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि भविष्यकालीन रोजगारक्षम कौशल्यांविषयी सविस्तर माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून चंद्रपूर व परिसरातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासक आणि करिअर सल्लागार यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (चंद्रपुरात शिवसेनेचे पाणी हक्क उठाव आंदोलन)

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इतर तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांमधील वाढत्या संधींबाबत तज्ज्ञांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली “श्री सुरेश धानोरकर स्मृती शिष्यवृत्ती” हे असणार आहे. या शिष्यवृत्ती उपक्रमाची संकल्पना, तिची पात्रता, मिळणारे लाभ आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Engineering Scholarship Chandrapur अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संधी

कार्यक्रमादरम्यान कोश्यस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधणार असून संस्थेतील विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रम, आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख शिक्षण, इंटर्नशिप, प्लेसमेंट संधी आणि वसतिगृह सुविधांविषयी मार्गदर्शन करतील. त्यासोबतच आयोजित विशेष करिअर समुपदेशन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखांची योग्य निवड, करिअर नियोजन, प्रवेश प्रक्रिया आणि उच्च शिक्षणाच्या विविध पर्यायांबाबत वैयक्तिक मार्गदर्शन (Personal Counselling) मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असेल. दर्जेदार तांत्रिक शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि उद्योगाभिमुख शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी सक्षम बनविणे यासाठी संस्था पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बेंगळुरूस्थित कोश्यस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था AICTE मान्यताप्राप्त असून विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाशी (VTU) संलग्न आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योग सहकार्य आणि उत्कृष्ट प्लेसमेंटसाठी ओळखली जाणारी ही संस्था विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. तसेच सन २००३ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेला ‘कोश्यस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’ हा बेंगळुरूमधील एक प्रतिष्ठित शैक्षणिक समूह असून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, नर्सिंग, अलाइड हेल्थ सायन्सेस आणि वाणिज्य अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी योगदान देत आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा प्रवेश व जनसंपर्क उपक्रमांचे प्रादेशिक संचालक सुधीर गौतम यांच्याशी ६३००५२०२४९ किंवा ९४९४८५१०५७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment