Chandrapur Swachhata Hi Seva अभियानाबाबत मार्गदर्शन करताना CEO पुलकित सिंह

चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात; CEO पुलकित सिंह यांचे नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 16, 2026

चंद्रपूर : Chandrapur Swachhata Hi Seva अभियानाचा जिल्हाभरात शुभारंभ होत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या काळात ही विशेष मोहीम राबवली जाईल. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.

या अभियानात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शाळांमध्ये उपक्रम आणि सफाई मित्रांचा सन्मान केला जाणार आहे. नागरिकांनी यात सहभागी होऊन चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Chandrapur Swachhata Hi Seva अभियानाची मुख्य उद्दिष्टे

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६’ अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छता, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धनाला व्यापक चालना देण्यात येणार आहे. दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात जिल्ह्यातील नागरिक, ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, बचतगट, विद्यार्थी, युवक तसेच विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर निर्माण करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे. (हे हि वाचा – गौरी विसर्जन करण्याकरिता तलावावर गेलेल्या महिलांवर मधमाश्यांचा हल्ला)


यावर्षीच्या अभियानाची संकल्पना “स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” अशी असून, स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्वच्छतेच्या लक्षित ठिकाणांवर विशेष उपक्रम

अभियानादरम्यान स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या CTUs (Cleanliness Target Units) व सार्वजनिक ठिकाणांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची ओळख पटवून त्यांचे सुशोभीकरण व स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, युवक व तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वच्छता ज्ञान यात्रा’, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, स्वच्छता व जलसंधारण विषयक संवाद, जनजागृतीपर कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सफाई मित्रांच्या सन्मानासह आरोग्य व सुरक्षिततेवर भर

अभियानामध्ये सफाई मित्र, स्वच्छताग्रही व स्वच्छता कामगारांसाठी एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांशी जोडणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, वैयक्तिक सुरक्षा साधनांचे (PPE Kits) वितरण तसेच त्यांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सफाई मित्रांच्या योगदानाचा सन्मान करण्यावरही विशेष भर राहणार आहे.

लोकसहभागातून स्वच्छतेला व्यापक चळवळीचे स्वरूप

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०2६ तसेच कचरा वर्गीकरण व कचरा संकलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छता स्थानिक/प्रादेशिक क्रीडा स्पर्धा, स्वच्छता पर्व, हरित पर्व, वृक्षारोपण उपक्रम, ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान, जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष उपक्रम तसेच २ ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा व बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.


“कचऱ्यातून उपयुक्त निर्मिती – कचऱ्यापासून संपत्ती” (Waste to Wealth) आणि “कचऱ्यापासून कलानिर्मिती” (Waste to Art) या उपक्रमांद्वारे कचऱ्याचे पुनर्वापर व पुनर्चक्रणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच Reuse, Reduce, Recycle (RRR) उपक्रम आणि Bulk Waste Generators यांच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाला चालना दिली जाणार आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय विभाग, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, बचतगट, युवक मंडळे, नागरिक समाज संस्था, कॉर्पोरेट संस्था तसेच नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


“स्वच्छता ही सेवा अभियान हे केवळ काही दिवसांचे अभियान न राहता स्वच्छतेची कायमस्वरूपी लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे. स्वच्छ गाव, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह  व जलजिवन मिशनअचे प्रकल्प संचालक मच्छींद्रनाथ धस यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment