चंद्रपुरात जल सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभानिमित्त निघालेली जलदिंडी

चंद्रपुरात जलदिंडीने जल सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ; पाणी बचतीचा संदेश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 3, 2026

चंद्रपूर : जल सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ चंद्रपुरात जलदिंडीच्या माध्यमातून करण्यात आला. जलसंपदा विभागाचे हे अभियान २ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविले जाणार आहे. जलदिंडीतून जलसंवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. दीना विश्रामगृह येथून दिंडीला सुरुवात झाली. ती जटपुरा गेट आणि गांधी चौकमार्गे पुन्हा विश्रामगृहात पोहोचली. नागरिकांमध्ये पाण्याच्या काटकसरीने वापराबाबत जनजागृती करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. (चंद्रपुरात अहिंसा पदयात्रा, वाचा हि बातमी)

जल सेवा संकल्प अभियान: जलदिंडीतून पाणी बचतीचा संदेश

दीना विश्रामगृह, चंद्रपूर येथून जलदिंडीला प्रारंभ झाला. जटपुरा गेट, गांधी चौकमार्गे ही दिंडी पुन्हा विश्रामगृह येथे पोहोचली. जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

धरणांमध्ये ७० टक्के साठा; एल निनोमुळे नियोजनाची गरज

यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असून, सध्या धरणांमध्ये सुमारे 70 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. ‘प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे; उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीने वापरूया’, असा संदेश जलदिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.

अभियानाच्या कालावधीत जलकर वसुली व तक्रार निवारण, शेतकरी आणि पाणी वापर संस्थांशी संवाद, जलजागृती, कालवा स्वच्छतेसाठी श्रमदान, कालवे व वितरण प्रणालीची पाहणी, प्रकल्पबाधित व पुनर्वसन गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच भूसंपादनाची कामे गतिमान करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा विवेकपूर्ण व कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनामध्ये शेतकरी व नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

जलदिंडीत चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंग, उपकार्यकारी अभियंता नरासपुरे, पुल्लावर व कांबळे, तसेच चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळातील उपविभागीय अभियंते जामगडे, यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

‘पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा आणि उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करा’, हा संदेश अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment