चंद्रपूर : चंद्रपूर अहिंसा पदयात्रा शुक्रवारी २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीनिमित्त काढण्यात आली. ‘गांधीजी के रास्ते’ तर्फे आयोजित या पदयात्रेला खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधी चौकातून सुरू झालेल्या पदयात्रेत शेकडो नागरिक, महिला, युवक आणि काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले. समारोप गांधी चौकातच झाला. तेथे खासदार धानोरकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले. (दुष्काळी परिस्थितीत मुख्यालय सोडून जाऊ नका-जिल्हाधिकारी यांचे आदेश, वाचा हि बातमी)
चंद्रपूर अहिंसा पदयात्रा: गांधी चौकातून सुरुवात आणि समारोप
ही पदयात्रा गांधी चौक येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून जात तिचा समारोप देखील गांधी चौक येथेच झाला. तेथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्याच हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “महात्मा गांधीजींनी दिलेली सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सर्वोदयाची शिकवण ही आजच्या काळात समाजाला एकत्र ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक समानता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा, ग्रामस्वराज्य आणि समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हीच खरी गांधी-विनोबांच्या विचारांची दिशा आहे. आज देशात शांतता, नैतिक मूल्ये आणि एकतेची भावना अधिक बळकट करण्याची नितांत गरज असून, काँग्रेस पक्ष नेहमीच या मार्गावर चालण्यासाठी कटिबद्ध आहे.”
पुढे बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “आजच्या या पदयात्रेच्या माध्यमातून गांधीजींचे हे विचार आणि सर्वोदयाची भावना घराघरांत व जनमानसात पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. या उपक्रमात शेकडो नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.”
यावेळी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर जिल्हा काँग्रेस चंदा वैरागडे, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, सेवादल जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, महानगरपालिका गटनेते सुरेंद्र अडबाले, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, मनीष तिवारी, शामकांत थेरे, निसार शेख, एजाज शेख, सुनीता गोवर्धन, जिल्हा सर्वोदय मंडळचे ईश्वर गौरकर तथा नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






