चंद्रपूर वोट बचाओ मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस कार्यकर्ते गांधी चौकातून पायी चालताना

चंद्रपूर वोट बचाओ मोर्चा : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर वोट बचाओ मोर्चा गुरुवारी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सततच्या नापिकीने त्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या, वाचा हि बातमी)

गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय : चंद्रपूर वोट बचाओ मोर्चाचा मार्ग

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत ‘वोट बचाओ – देश बचाओ’ या जनआंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. चंद्रपूर येथील ऐतिहासिक गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पैदल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावर धानोरकर आणि धोटे काय म्हणाले?

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या, “‘वोट बचाओ – देश बचाओ’ हा केवळ एक नारा नसून सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी पुकारलेला लढा आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या अधिकारांशी आणि संविधानिक मूल्यांशी जोडलेली व्यवस्था आहे. मतदारांचा अधिकार सुरक्षित राहणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील.”

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आमचे नेते मा. राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडी सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहे आणि नागरिकांनीही आपल्या अधिकारांसाठी जागृक राहणे आवश्यक आहे.

जाहीर सभेनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध प्रमुख मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांच्या नावे सादर केले.

या आंदोलनात आमदार ॲड. अभिजित वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, संतोष लहामगे, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा चांदाताई  वैरागडे, प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, उमाकांत धांडे, सपना मोरे, पवन भगत, सुनीता गोवर्धन, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, राजु रेड्डी, दिनेश चोखारे, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, रंजन लांडे, गोविंदा उपरे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, निर्मला कुडमेथे, युवक काँग्रेसचे सौरभ टिपले, नरेश गुलप्ल्ली, मंगेश बावणे, अभिजीत गोंगले, आशिष बोंडे यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment