मारडा शेतकरी आत्महत्या : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचे प्रातिनिधिक छायाचित्र

नापिकीचे संकट : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

चंद्रपूर – मारडा शेतकरी आत्महत्या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मारडा येथील ५२ वर्षीय शेतकरी मनीष माकोडे यांचा ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीत सततच्या नापिकीचा उल्लेख आला आहे. त्यांच्या नावावर बँक कर्ज नसल्याचेही तपासात आढळले. पोलिसांनी प्राथमिक अहवाल तयार केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. (१० ऑक्टोबर पूर्वी दुष्काळी पंचनामे पूर्ण करा, वाचा महत्वाची बातमी)

मारडा शेतकरी आत्महत्या : पोलिसांची प्राथमिक माहिती

चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सततच्या नापिकीला कंटाळून एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आपल्याच शेतात आवळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची वेदनादायी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मारडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात तीव्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा मारडा येथील रहिवासी असलेले मनीष रघुनाथ माकोडे (वय ५२ वर्षे) यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मौजा मारडा येथील शेत सर्व्हे नंबर २४५/अ/१ मधील आवळीच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मृत मनीष माकोडे यांच्या नावावर मौजा मारडा येथे स.नं. २४५/अ/१, २४५/ब/१ आणि १२२ आराजी ०.८०, १.०० व २.६९ हे.आर अशी समाईक शेतजमीन आहे. त्यांच्या नावावर कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, सततच्या नापिकीमुळेच त्यांनी ही आत्महत्या केल्याचे घटनास्थळी केलेल्या चौकशीत सांगण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे माकोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत मनीष माकोडे यांच्या पश्चात पत्नी श्रीमती मंगला मनीष माकोडे, दोन मुली कु. जानवी मनीष माकोडे व कु. गौरी मनीष माकोडे, आई श्रीमती पारवताबाई रघुनाथ माकोडे तसेच दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment