मारडा शेतकरी कुटुंब मदत देताना ललित कासट आणि माकोडे कुटुंबीय

ललित कासट परिवाराकडून शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 18, 2026

चंद्रपूर: मारडा शेतकरी कुटुंब मदत म्हणून शिवसैनिक ललित कासट यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून २१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. ही मदत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मारडा येथील माकोडे कुटुंबाला देण्यात आली. स्व. मनीष माकोडे यांनी शेतीतील अडचणींमुळे जीवन संपवल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. ‘ललित कासट परिवार’तर्फे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. कासट यांनी सांगितले, की वाढदिवस हा समाजाच्या दुःखात सहभागी होण्याची संधी असते. (९ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, वाचा हि बातमी)

आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू व संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहत शिवसैनिक ललित कासट यांनी सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मारडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ललित कासट परिवारातर्फे २१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करून हा वाढदिवस अत्यंत संवेदनशीलतेने साजरा करण्यात आला.

मारडा शेतकरी कुटुंब मदत : वाढदिवसानिमित्त उपक्रम

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मारडा येथील शेतकरी स्व. मनीष रघुनाथजी माकोडे यांनी शेतीतील विविध संकटांमुळे हतबल होऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे माकोडे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, कुटुंबाचा मुख्य आधार हरवल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या कठीण प्रसंगाची दखल घेत, माकोडे कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आणि त्यांना काही अंशी आर्थिक आधार मिळावा या सामाजिक भावनेतून ललित कासट यांनी पुढाकार घेतला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ललित कासट परिवार’तर्फे पीडित माकोडे कुटुंबीयांना ₹२१,०००/- (एकवीस हजार रुपये) ची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

“वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजातील गरजू आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदतीचा हात देण्याची एक संधी असते. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि माणुसकीची भावना जपत हा छोटासा मदतीचा प्रयत्न केला आहे,” अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. तसेच माकोडे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे व या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही या वेळी ईश्वरचरणी करण्यात आली. ललित कासट यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “ललित कासट परिवाराकडून शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत”

Leave a Comment