Ghugus River Drowning Case मध्ये वर्धा नदीतील दुर्घटना

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 12, 2026

घुग्घुस : Ghugus River Drowning Case मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात वर्धा नदीच्या पात्रात बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्व. सम्यक सोनटक्के, स्व. सन्नी आसम्पेल्ली, स्व. रोहित बोबडे, स्व. नकुल केलझरकर आणि स्व. तन्मय पथाडे या तरुणांच्या निधनाने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीची मागणी केली आहे. ही घटना परिसरात अत्यंत भावनिक वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. (चंद्रपूर भाजप राज्यात अव्वल)

वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू पावलेल्या घुग्घुस येथील स्व. सम्यक सोनटक्के, स्व. सन्नी आसम्पेल्ली, स्व. रोहित बोबडे, स्व. नकुल केलझरकर आणि स्व. तन्मय पथाडे या तरुण युवकांच्या निवासस्थानी जाऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. एकाच वेळी गावातील पाच उमद्या आणि तरुण मुलांच्या अकाली जाण्याने संपूर्ण घुग्घुस शहरावर व त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर हा शब्दांच्या पलीकडचा आहे. या अत्यंत दुःखद प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शोकग्रस्त माता-पित्यांना व कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Ghugus River Drowning Case मध्ये मोठी दुर्घटना

या प्रसंगी त्यांच्यासोबत महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, उपाध्यक्ष राजू रेड्डी, बांधकाम सभापती रोशन पाचारे, तसेच नुरुल सिद्दीकी, श्रुतिका कलवल, सूरज कन्नूर, सुनिता पेनवार, आशा पांगहाटे, अर्चना सरोकर, वैशाली चिकणकर, तोफिक शेख, मनोज खोब्रागडे, अझर शेख, शेखर तांगडपल्ली, प्रेमानंद जोगी, सुधाकर जुनारकर, सय्यद अनवर आणि सुनील चिलका आदी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या कठीण प्रसंगात संपूर्ण धानोरकर कुटुंब आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी शोकग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मृत युवक हे अत्यंत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबातील पाठीराखे हरपले आहेत. या कुटुंबांचे झालेले नुकसान कधीही न भरून निघणारे आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्काळ मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून या पाचही मृत युवकांच्या कुटुंबियांना ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून विशेष आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली आहे. “ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या माता-पित्यांना व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थना खासदार प्रतिभा धानोरकर आणि उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी यावेळी केली.

Advertisement
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment