ब्रह्मपुरी काँग्रेस आंदोलन : शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करताना काँग्रेस कार्यकर्ते

ब्रह्मपुरीत कांग्रेसने पाळला काळा दिवस

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी काँग्रेस आंदोलन शहरातील शिवाजी महाराज चौकात ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ब्रह्मपुरी तालुका आणि शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. केंद्र सरकारची धोरणे आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना अडवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून हे आंदोलन झाले. (चंद्रपुरात निर्विघ्न उत्सव साजरे करा, महावितरणचे आवाहन, वाचा हि बातमी)

ब्रह्मपुरी काँग्रेस आंदोलन : शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततेत जात असताना त्यांना अडविण्यात आले. काॅंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच ‘इंडिया’ आघाडीच्या अन्य खासदारांशी पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा, त्यांच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा आणि काही नेत्यांना दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि जनतेच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर झालेली कारवाई हा संविधानावरील हल्ला असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने ८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविले जात नाही आणि निवडणूक व्यवस्थेची निष्पक्षता पूर्णपणे बहाल होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

यावेळी तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment