आरवट जुगार अड्डा : चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसराचे प्रातिनिधिक छायाचित्र

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालतो जुगार अड्डा, नवीन ठाणेदार लक्ष देणार का?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

चंद्रपूर: आरवट जुगार अड्डा चंद्रपूर शहरानजीकच्या परिसरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आरवट मार्गावरील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर हा अड्डा चालवला जात असल्याचे सांगितले जाते. स्थानिक सूत्रांनुसार, शहराच्या विविध भागांतून लोक येथे येतात आणि दररोज मोठी उलाढाल होते. मात्र अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या नवीन ठाणेदारांकडून आता काय कारवाई होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (पगार मागितला कि खंडणी? दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात वेगळी बाजू समोर, वाचा हि बातमी)

नवीन ठाणेदारांसमोर कारवाईचे आव्हान

शहरानजीकच्या आरवट परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. आरवट मार्गावरील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर शहरातील विविध भागांतून जुगार खेळणारे लोक पोहोचत असल्याची चर्चा आहे. येथे येणाऱ्या जुगारींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र हा सर्व जुगार पोलिसांच्या नाकाखाली सुरु असूनसुद्धा पोलीस कारवाई करण्यापासून घाबरत आहे कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अवैध जुगार अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल होते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायाबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असूनही, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रपूर शहर पोलिसांच्या हद्दीत येत असलेला हा जुगार अड्डा नवीन ठाणेदार उध्वस्त करणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार.

नुकतेच शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणाऱ्या नवीन ठाणेदारांसमोर आरवट परिसरातील हा जुगार अड्डा बंद पाडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुन्हे शोध पथकाची चमू या अड्ड्याकडे इतक्या वर्षांपासून का दुर्लक्ष करीत आहे? कि जुगार अड्डा चालविणाऱ्याला अलिखित परवानगी तर दिली नाही न? अशी चर्चा सध्या जनमानसात सुरु आहे. आता पोलीस या अवैध जुगार अड्ड्याची चौकशी करून धडक कारवाई करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरवट परिसरातील या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment