चंद्रपूर : Durgapur Scrap Raid Chandrapur मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका भंगार दुकानावर मोठी कारवाई केली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताज स्क्रॅपमधून १ लाख ३२ हजार रुपयांचा संशयित मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर पोलिसांनी २ दारूविक्रेत्यांना केले तडीपार)
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका स्क्रॅपच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून संशयितरीत्या चोरी करून आणलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडसी कारवाईत ॲल्युमिनियम तार, लोखंडी साहित्यासह एकूण १ लाख ३२ हजार २५० रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर भंगार खरेदी-विक्री करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
Durgapur Scrap Raid Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेची धडक मोहीम
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग मूल व चंद्रपूर शहर पथकाला दुर्गापूर हद्दीतील ‘ताज स्क्रॅप’ या दुकानात चोरीचा माल साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ताज स्क्रॅपवर छापा टाकला. दुकानाची कसून झडती घेतली असता त्या ठिकाणी १ लाख २ हजार ३०० रुपये किमतीच्या लोखंडी सलाखी, १२ हजार ७५० रुपयांची ॲल्युमिनियम तार, ८ हजार ८०० रुपयांचे लोखंडी इलेक्ट्रिक पोल आणि ८ हजार रुपये किमतीचे डी.पी.चे लोखंडी साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य चोरीचे असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी संपूर्ण १ लाख ३२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
या प्रकरणी ताज स्क्रॅपशी संबंधित प्रमोद रामलाल सूर्यवंशी (वय ४७ वर्षे, रा. नेरी, दुर्गापूर) याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा नोंदवला असून हा चोरीचा माल नेमका कुठून आणि कोणाकडून खरेदी करण्यात आला होता, या दिशेने सखोल तपास सुरू केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






