दुर्गापूर खंडणी प्रकरण : दुर्गापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

पगार मागितला की खंडणी? दुर्गापूरमधील प्रकरणात दोन बाजू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

चंद्रपूर – दुर्गापूर खंडणी प्रकरणात वेकोलि अंतर्गत KVR कंपनीत खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला. अजय कुचनकर, सुमित रामटेके आणि पवन जाधव अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. कंपनी व्यवस्थापक साईप्रकाश गाजूला यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली.

मात्र, हे तरुण पगार मागण्यासाठी आले होते, असे गाजूला यांनी माध्यमांना सांगितल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.(चंद्रपुरात २४ ग्राम एमडी जप्त, वाचा बातमी)

दुर्गापूर खंडणी प्रकरण : पोलिसांची बाजू

७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवट मधील kvr कंपनीत व्यवस्थापक साईप्रकाश गाजूला यांनी पोलिसांना कॉल करीत कंपनीत काही युवकांनी गोंधळ घालत पैश्याची मागणी करीत आहे. दुर्गापूर पोलीस तात्काळ कंपनीत दाखल झाले त्याठिकाणी अजय कुचनकर, सुमित रामटेके व पवन जाधव या तिघांना अटक करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर प्रकरण जसे दिसत आहे तसे नाही याची दुसरी बाजू आपण जाणून घ्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते तीन युवक कंपनी चालू देणार नाही, जर चालवायची असेल तर महिना ५० हजार रुपये द्या अशी मागणी केली. कंपनी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असे सांगण्यात आले.

तर फिर्यादी गाजूला यांनी याउलट प्रसारमाध्यमांना माहिती दिली कि, सदर युवक हे पगार मागण्यासाठी आले होते, त्यावरून हे सर्व वादंग झालं. जर ते पगार मागण्यासाठी आले होते तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा का दाखल करण्यात आला? ते कंपनीत कामाला होते तर त्यांना खंडणी मागण्याची गरज काय होती? यावर पोलिसांचे आश्चर्यकारक उत्तर म्हणजे मकि फिर्यादी गाजूला यांना समजत नसल्याने त्यांनी ती माहिती दिली असे सांगितले.

जर तिन्ही युवकांनी खंडणी मागितली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण कंपनीने दबाव आणून हे सर्व केले असेल तर हि अन्यायकारक बाब आहे, कंपनीत काम केल्यावर जर त्यांना पगार मिळाला नाही तर ते पगार मागायला जातीलच, मग याठिकाणी खंडणीचा गुन्हा का दाखल करण्यात आला? हि समजून न समजण्यासारखी बाब आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment