चंद्रपुरात MD Powder जप्ती कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखा

MD Powder । चंद्रपुरात मध्यरात्री पोलिसांचा सापळा; 168 ग्रॅम MD Powder जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 3, 2026

MD Powder : चंद्रपूर – जिल्हा अंमली पदार्थ मुक्त व्हावा याकरिता चंद्रपूर पोलीस सलग कारवाई मोहीम राबवित आहे, पोलिसांच्या कारवाई मुळे अंमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहे. २ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुरात मोठी कारवाई करीत तब्बल १६८.९४ ग्राम एमडी पावडर सह एकूण १४ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. (बनावट पोलिसांनी चंद्रपुरात २ लाख ८० हजारांचे सोने लुटले )

२ जून रोजी चंद्रपुरात गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमडी पावडरची विक्री करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे ३ जून ला मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर-भद्रावती मार्गावरील हॉटेल जमघट समोर गुन्हे शाखेने सापळा रचला.

चंद्रपुरात MD Powder विरोधात मोठी कारवाई

मध्यरात्री बारा वाजून ३५ मिनिटांनी पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक MH ४९ F १५६९ येताना दिसली असता पोलिसांनी सदर वाहनाला थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये १६८.९४ ग्राम एमडी मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आले. चालकाला नाव विचारले असता त्याने ४० वर्षीय अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार राहणार तुकडोजी चौक नागपूर असे सांगितले. एमडी पावडर किंमत ८ लाख ५० हजार सह गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १४ लाख ११ हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला.

आरोपीविरोधात भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये कलम ८ (क, २२ (क), २९ गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ NDPS अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.

चंद्रपुरात किती MD Powder जप्त करण्यात आली?

168.94 ग्रॅम MD Powder जप्त करण्यात आली.

आरोपी कुठला आहे?

आरोपी नागपूर येथील रहिवासी आहे.

जप्त मुद्देमालाची किंमत किती आहे?

एकूण 14.11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला?

NDPS Act 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment