चंद्रपुरात Illicit Liquor विरोधात पोलिसांची कारवाई करताना जप्त मोहा दारू

Illicit Liquor । चंद्रपुरात पोलिसांची धडक कारवाई; 867 लिटर मोहा दारू-सडवा जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 3, 2026

Illicit Liquor : चंद्रपूर – चंद्रपूर शहर पोलिसांच्या अवैध धंदे कारवाई मोहिमेत २ जून ला महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात मोहा गावठी दारू व मोहा फुल सडवा असा एकूण ५६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलिसांनी ३ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहे. (चंद्रपुरात १६८ ग्राम एमडी पावडर जप्त)

चंद्रपुरात Illicit Liquor विरोधात पोलिसांची धडक कारवाई

२ जून रोजी महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात अवैध पद्धतीने दारू काढत ती विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांवर मिळाल्यावर छापेमारी करीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी ३ महिलांकडे मोहा गावठी दारू २६७ लिटर व मोह फुल सडवा ६०० लिटर व इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ३ वेगवेगळे गुन्हे नोंद करण्याची कारवाई पोलिसांतर्फे सुरु आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोलीस कर्मचारी संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, सुशांत घिवे व दीपिका झिंगरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment