चंद्रपूर नूतन SP Office इमारतीसंदर्भातील मंत्रालयातील आढावा बैठक

SP Office । चंद्रपुरात भव्य SP Office उभारणार; आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीला मंजुरीची गती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 3, 2026

SP Office : मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम व आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे, आकर्षक, भव्य स्वरूपाचे असावे, असे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित सादरीकरण व आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी मा. पंकजजी भोयर, राज्यमंत्री (गृह-ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने प्रस्तावित इमारतीचा आराखडा सादर करण्यात आला. (चंद्रपूर, बल्लारशा व विदर्भातील रेल्वे प्रवाश्याना दिलासा, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा)

बैठकीस महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास वाडके, मुख्य अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर चंद्रपूर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

चंद्रपुरात आधुनिक SP Office उभारण्याचा निर्णय

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील इतर प्रमुख शासकीय इमारतींशी सुसंगत असे भव्य, प्रशस्त, आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त पोलीस अधीक्षक कार्यालय उभारण्यावर भर दिला. तसेच प्रस्तावित संकुलात चंद्रपूर वाहतूक शाखेच्या कार्यालयाचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार फर्निचर, सौर ऊर्जा प्रणाली, अधिक क्षमतेच्या लिफ्ट, प्रशस्त वाहनतळ, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा तसेच आधुनिक कार्यसंस्कृतीला पूरक पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात यावा, असेही आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आधुनिक, सुरक्षित व सर्व सुविधांनी सुसज्ज कार्यस्थळ आवश्यक असल्याचे नमूद करत बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रणास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीदरम्यान राज्यमंत्री पंकजजी भोयर यांनीही प्रस्तावित प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारित आराखडा लवकरात लवकर अंतिम करण्याचे निर्देश दिले. तसेच बांधकामाची वेळबद्ध अंमलबजावणी आणि गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले.

बैठकीत नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बांधकामात गुणवत्तापूर्ण साहित्याचा वापर, आकर्षक बाह्य व अंतर्गत रचना, वाहतूक शाखेचा समावेश, सौर ऊर्जा प्रणाली, उच्च क्षमतेच्या लिफ्ट, प्रशस्त पार्किंग, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा व दर्जेदार फर्निचर यांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच सुधारित आराखडा तयार करून पुढील मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment