भिवापूर हनुमान मंदिर जीर्णोद्धार आराखड्याचे सादरीकरण पाहताना आमदार सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरातील भिवापूर हनुमान मंदिराचा आराखडा तयार; हनुमान जयंतीला भूमिपूजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 25, 2026

चंद्रपूर – भिवापूर हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण चंद्रपुरातील भिवापूर वार्डात करण्यात आले. हे सादरीकरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाले. येत्या हनुमान जयंतीला बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या इंग्रजांविरुद्धच्या एल्गाराशी हे मंदिर जोडलेले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. (चंद्रपूर बल्लारपूर महामार्गाचे काम रखडले, मनसेचा इशारा, वाचा सविस्तर)

भिवापूर हनुमान मंदिर जीर्णोद्धार आराखड्याचे सादरीकरण

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या इंग्रजांविरुद्धच्या ऐतिहासिक एल्गाराची साक्ष असलेल्या चंद्रपुरातील भिवापूर येथील पुरातन हनुमान मंदिराचा धार्मिक वारसा जपत या श्रद्धास्थानाला नवे वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, भाविकांची श्रद्धा आणि परिसराच्या विकासाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या पुढाकारातून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराच्या भव्य जीर्णोद्धाराचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे सादरीकरण भिवापूर वार्डातील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले. येत्या हनुमान जयंतीला मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा मानसही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भिवापूर परिसरातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि मंदिराच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केलेल्या मंदिराच्या नूतनीकरण व जीर्णोद्धाराच्या मागणीची तत्काळ दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हनुमान मंदिराचा सर्वंकष आराखडा तयार केला. या आराखड्याचे सादरीकरण स्वतः आ. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंदिराच्या विकासाबाबत सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि स्वयंसेवकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेत, आवश्यक सुधारणा करण्यावर आ.मुनगंटीवार यांनी भर दिला. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात कोणतीही उणीव राहू नये आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भिवापूरचे हे हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराला धार्मिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी याच परिसरात इंग्रजांविरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यानंतर चिमूर क्रांतीचा ऐतिहासिक अध्याय घडला. त्यामुळे या परिसराचा इतिहास जपणे आणि मंदिराचे नूतनीकरण करून भाविकांसाठी उत्तम सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

या भागातील पदाधिकारी आणि विशेषतः नगरसेवक वसंता देशमुख तसेच श्री. खांडरे यांनी मंदिर परिसर अधिक सुंदर आणि सुविधायुक्त व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. हनुमानजी हे सेवा, भक्ती आणि गतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे या कामालाही गती मिळाली पाहिजे. मंदिराच्या नूतनीकरण व जीर्णोद्धारात कोणतीही उणीव किंवा कमतरता राहू नये. भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठीच आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले आहे, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

याप्रसंगी महापौर संगीताताई खांडेकर, भाजपा वरिष्ठ नेते प्रमोद कडू, नगरसेवक राहुल पावडे, नगरसेवक प्रज्वलंत कडू, नगरसेवक वसंता देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, पुरुषोत्तम सहारे, संदीप आगलावे, सचिन यामावार, प्रभाकर पटकोटवार, प्रेमिलाताई गटलेवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमापूर्वी हनुमान मंदिर सेवा समिती आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि हनुमानजींचे दर्शन घेतले.

धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सातत्यपूर्ण पुढाकार

 चंद्रपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचे जतन, संवर्धन आणि विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. मूल तालुक्यातील मरोडा येथील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला महाराष्ट्र शासनाकडून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच चंद्रपुरातील बालाजी वार्डातील विठ्ठल मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत.

आ.मुनगंटीवार यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील गड-किल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून स्वतंत्र निधी राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील १४ पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. चंद्रपूर येथील अष्टशक्तीपीठ श्री महाकाली मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ६० कोटी रुपयांचा विकास आराखडा, तर यात्रेकरूंच्या सुविधांसाठी २ कोटी ९० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. धार्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या याच भूमिकेतून भिवापूर येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार साकारण्यात येत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “चंद्रपुरातील भिवापूर हनुमान मंदिराचा आराखडा तयार; हनुमान जयंतीला भूमिपूजन”

Leave a Comment